Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raveena Tandon: ‘या’ गाण्यासाठी रवीना टंडनने १२ तास थंड पाण्यात केलं शूटिंग; सांगितला धक्कादायक किस्सा

Raveena Tandon: रवीना टंडनने ‘कोण होणार करोडपती’मध्ये ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याच्या शूटिंगचा अनुभव सांगितला. तीन दिवसांच्या शूटिंगमध्ये १२ तास थंड पाण्यात काम करावं लागलं होतं.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 09, 2026 | 04:45 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Raveena Tandon: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचं ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. पार्टी असो किंवा एखादा खास कार्यक्रम, हे गाणं वाजलं की अनेकजण ठेका धरतात. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील या गाण्यात रवीना आणि अक्षयची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. पडद्यावर हे गाणं जितकं रोमँटिक आणि सुंदर दिसतं, तितकंच त्याचं चित्रीकरण आव्हानात्मक होतं. नुकतंच रवीना टंडनने ‘कोण होणार करोडपती’ या रिअॅलिटी क्विझ शोमध्ये या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक खास किस्सा सांगितला.

१२ तास थंड पाण्यात केलं होतं शूटिंग

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सूत्रसंचालिका माधुरी दीक्षित यांच्याशी संवाद साधताना रवीनाने ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगितला. हे गाणं शूट करण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले होते. या तीन दिवसांमध्ये तिला थंड पाण्यात सलग १२ तास काम करावं लागलं होतं.

रवीनाने सांगितलं की, त्या काळात चित्रपटातील गाण्यांच्या शूटिंगसाठी अनेक दिवस लागायचे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी पावसाचा परिणाम दाखवण्यासाठी टँकरमध्ये पाणी साठवून ठेवलं जायचं. मात्र, टँकरमध्ये बराच वेळ राहिल्यामुळे हे पाणी अतिशय थंड व्हायचं. त्यानंतर हेच थंड पाणी रवीना आणि अक्षय कुमार यांच्यावर फवारलं जायचं. अशा परिस्थितीत तासनतास शूटिंग करणं तिच्यासाठी मोठं आव्हान होतं.

OTT Releases This Week: घरबसल्या मनोरंजनासाठी सज्ज व्हा! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ५ जबरदस्त चित्रपट आणि सीरिज

माधुरी दीक्षितनेही सांगितला पावसाच्या गाण्यांचा अनुभव

रवीनाचा हा अनुभव ऐकल्यानंतर माधुरी दीक्षितनेही तिच्या कारकिर्दीतील पावसाच्या गाण्यांच्या शूटिंगची आठवण सांगितली. पावसाच्या गाण्यांचं चित्रीकरण करताना कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दोन टेकच्या मधल्या वेळेत शरीर उबदार ठेवणं हे मोठं आव्हान असतं, असं माधुरीने सांगितलं. पडद्यावर पावसातील रोमँटिक दृश्यं सुंदर दिसत असली, तरी प्रत्यक्षात त्यांचं शूटिंग करणं सोपं नसतं.

वर्षाला ३० चित्रपटांमध्ये करायची काम

याच संवादादरम्यान रवीनाने तिच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील व्यस्त वेळापत्रकाबद्दलही सांगितलं. एक काळ असा होता, जेव्हा ती वर्षाला जवळपास ३० चित्रपटांचं शूटिंग करत होती. तिचं वेळापत्रक इतकं व्यस्त असायचं की, तिला विश्रांतीसाठीही पुरेसा वेळ मिळत नव्हता.

रवीनाच्या म्हणण्यानुसार, ती सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत एका चित्रपटाचं शूटिंग करायची. त्यानंतर दुपारी २ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत दुसऱ्या चित्रपटासाठी काम करायची. तिथून थेट तिसऱ्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचायची. अनेकदा सततच्या शूटिंगमुळे घरी जाऊन फ्रेश होण्यासाठी किंवा कपडे बदलण्यासाठीही तिला वेळ मिळत नसे.

Alia Bhatt-Ranbir Kapoor: नव्या बंगल्यात आलिया-रणबीरची पहिली दिवाळी! चिमुकल्या राहासोबत केली लक्ष्मीपूजा, पाहा घरातील सुंदर फोटो

आजही लोकप्रिय आहे ‘टिप टिप बरसा पानी’ गाणं

रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित झालेलं ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं ‘मोहरा’ चित्रपटातील आहे. राजीव राय दिग्दर्शित हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील या गाण्याला आजही प्रेक्षकांची पसंती मिळते. रवीना टंडनच्या कारकिर्दीतील हे सर्वात लोकप्रिय आणि लक्षात राहिलेल्या गाण्यांपैकी एक आहे. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम असून त्याच्या शूटिंगमागचा संघर्ष ऐकून चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे.

Web Title: Raveena tandon tip tip barsa pani 12 hours cold water shooting story ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • entertainment

संबंधित बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor: नव्या बंगल्यात आलिया-रणबीरची पहिली दिवाळी! चिमुकल्या राहासोबत केली लक्ष्मीपूजा, पाहा घरातील सुंदर फोटो
1

Alia Bhatt-Ranbir Kapoor: नव्या बंगल्यात आलिया-रणबीरची पहिली दिवाळी! चिमुकल्या राहासोबत केली लक्ष्मीपूजा, पाहा घरातील सुंदर फोटो

OTT Releases This Week: घरबसल्या मनोरंजनासाठी सज्ज व्हा! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ५ जबरदस्त चित्रपट आणि सीरिज
2

OTT Releases This Week: घरबसल्या मनोरंजनासाठी सज्ज व्हा! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ५ जबरदस्त चित्रपट आणि सीरिज

दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्याने विकल्या फुलांच्या माळा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
3

दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्याने विकल्या फुलांच्या माळा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Prathamesh Parab: प्रथमेश परबची चौथ्या घरात गुंतवणूक; मुंबईत आणखी एका ठिकाणी साकारलं हक्काच्या घराचं स्वप्न
4

Prathamesh Parab: प्रथमेश परबची चौथ्या घरात गुंतवणूक; मुंबईत आणखी एका ठिकाणी साकारलं हक्काच्या घराचं स्वप्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.