Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakriti Nautiyal : सिनेसृष्टीतून आणखीन एक जोडपं दुरावलं! घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज, लग्नाला झालीत दोन वर्ष

'नामकरण' आणि 'सैराब' फेम अभिनेत्री प्रकृती नौटियाल पती वंदित शाहपासून विभक्त होत असून, दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सहा महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर १४ फेब्रुवारी २०२४ रोजी विवाह केलेल्या या जोडप्याने सततचे मतभेद आणि वाद वाढल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2026 | 09:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रकृती नौटियाल हिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा बदल घडला आहे. ‘नामकरण’ आणि ‘सैराब’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्रकृती पती वंदित शाहपासून विभक्त होत असून, दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचे वृत्त आहे.

‘सौभाग्यवती सरपंच २’चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; ‘या’ तारखेपासून Ultra Jhakaas Marathi OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला

माध्यमांतील माहितीनुसार, प्रकृती आणि वंदित यांनी सुमारे सहा महिने एकमेकांना डेट केल्यानंतर १४ फेब्रुवारी २०२४ रोजी विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये सतत मतभेद आणि वाद निर्माण होऊ लागले. कालांतराने हे मतभेद इतके वाढले की, एकत्र राहणे शक्य नसल्याची जाणीव दोघांनाही झाली. अखेर परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकृती ऑगस्ट २०२४ पासून पतीपासून वेगळी राहत आहे. घटस्फोटाबाबत अद्याप प्रकृती किंवा वंदित यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी जवळच्या सूत्रांनी नात्यातील वाढत्या दुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे.

प्रकृती नौटियाल सध्या ‘सैराब’ या मालिकेत झळकत आहे. यापूर्वी तिने ‘नामकरण’, ‘शहजादी… है तू दिल की’ आणि ‘कार्तिक दीपम’ च्या हिंदी रिमेकमध्ये काम केले आहे. ‘कार्तिक दीपम’चा हिंदी रिमेक कमी टीआरपीमुळे काही महिन्यांतच बंद झाला होता. अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रकृतीच्या वैयक्तिक आयुष्यातील या घडामोडीमुळे तिच्या चाहत्यांमध्येही चर्चा रंगली आहे.

Bhootam Bhayam Movie : आता बहरणार प्रेमपुष्प! आली आली ‘सरोजिनी’, GenZ साठी स्पेशल लव्ह सॉंग

आदिनाथ -उर्मिलाने वेगळं होण्याचा घेतला निर्णय!

मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे यांनी तब्बल १५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी सोशल मीडियावर संयुक्त निवेदन शेअर करत हा निर्णय परस्पर संमतीने घेतल्याचे सांगितले. पती-पत्नी म्हणून त्यांचा प्रवास संपला असला, तरी मुलगी जिजाच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही मिळून पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंतीही केली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर दोघांनी अधिकृत घोषणा करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

Web Title: Prakriti nautiyal has filed for divorce from her husband vandit shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Bollywood
  • Divorce

संबंधित बातम्या

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
1

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.