Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pranit More Biryani Controversy : बिर्याणी वादानंतर भावुक झाला प्रणित मोरे; पहिल्याच लाइव्ह शोमध्ये अश्रू अनावर

Pranit More Biryani Controversy: '३७० रुपयांच्या बिर्याणी' वादानंतर स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे जॉर्जियातील पहिल्याच लाईव्ह शोमध्ये भावूक झाला. स्टेजवरच अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 03, 2026 | 08:40 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Pranit More Biryani Controversy: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेचा एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात (Pranit More Biryani Controversy)सापडलेल्या प्रणितने जॉर्जियामधील आपल्या पहिल्याच लाईव्ह शोदरम्यान स्टेजवरच अश्रू अनावर झाले. या कठीण काळात चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्याने प्रेक्षकांसमोर कृतज्ञता व्यक्त केली.

व्हायरल व्हिडिओनुसार, १४ जून २०२६ रोजी जॉर्जियामध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रणितने काही वेळासाठी आपला परफॉर्मन्स थांबवला आणि अलीकडील वादाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. डोळ्यांत अश्रू आणत त्याने सांगितले की, स्टेजवर येताना लोक आपल्याला स्वीकारतील की नाही, अशी भीती त्याच्या मनात होती. मात्र, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे त्याला नव्याने उभं राहण्याची ताकद मिळाली.

प्रणितने यावेळी स्पष्ट केले की, त्याने कधीही पैसा किंवा प्रसिद्धीसाठी स्टँड-अप कॉमेडीची वाट निवडली नव्हती. आधीची नोकरी सोडल्यानंतर लोकांना हसवणं आणि त्यातून आनंद मिळवणं, हाच त्याचा खरा उद्देश होता.

This Clip Is from his Georgia Show (14th June)#PranitMore pic.twitter.com/NtTHGUhkB0 — Supreme (@DarshanShi67146) July 30, 2026

Huma Qureshi: ‘टॉक्सिक’ वादावर हुमा कुरेशीने सोडले मौन; कियारा अडवाणीच्या समर्थनात येत म्हणाली, ‘हे खूपच किळसवाणे…’

आईच्या शिकवणीचा केला उल्लेख

भावूक होत प्रणितने आपल्या आईने दिलेल्या शिकवणीचाही उल्लेख केला. एका वादानंतर तो खचला असताना आईने त्याला, “प्रत्येकाकडून चुका होतात. चूक मान्य करून माफी मागितलीस, आता तुझी पुढची कृतीच लोकांना उत्तर देईल,” असा सल्ला दिल्याचे त्याने सांगितले. आईच्या या शब्दांनीच पुन्हा रंगमंचावर उभं राहण्याचं बळ मिळाल्याचं त्याने नमूद केलं.

‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमलं सभागृह

प्रणित बोलताना भावूक होताच सभागृहातील प्रेक्षकांनी त्याला जोरदार दाद दिली. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांसह टाळ्यांचा कडकडाट आणि “We Love You” अशा घोषणांनी संपूर्ण हॉल दुमदुमून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रणितने सर्वांचे आभार मानत सांगितले की, आपल्या कारकिर्दीत अनेक शो केले असले तरी जॉर्जियातील हा शो आणि तेथील प्रेक्षक त्याच्या कायम स्मरणात राहतील.

Ramayana: ‘रामायण’मध्ये आधी ‘या’ ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची झाली होती राजा दशरथसाठी निवड; ऑडिशननंतर अरुण गोविलची वर्णी

Web Title: Pranit more biryani controversy emotional live show georgia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Pranit More
  • Stand-Up Comedian

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.