Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pranit More Controversy : 370 च्या बिर्याणी’वरून गोंधळ, वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या तरुणाला कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता

प्रणीत मोरेच्या लाईव्ह शोदरम्यान केलेल्या '370 रुपयांची बिर्याणी' या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुरुग्राममधील हिमांशूला नोकरी गमवावी लागली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 10, 2026 | 12:04 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियाच्या युगात काही क्षणांची प्रसिद्धी अनेकदा मोठी किंमत मोजायला लावू शकते. अशीच एक घटना गुरुग्राममधील हिमांशूसोबत घडली आहे. विनोदी कलाकार प्रणीत मोरे यांच्या लाईव्ह शोदरम्यान केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संबंधित तरुणाला नोकरी गमवावी लागली आहे.

‘370 रुपयांची बिर्याणी’ या वक्तव्याशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी या टिप्पणीवर टीका करत ती महिलांप्रती अनादर दर्शवणारी आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हटले. काही तासांतच हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर झाला आणि संबंधित तरुणाची ओळखही समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गुरुग्राममधील एका डिझाइन कंपनीत कार्यरत होता. प्रकरण कंपनीपर्यंत पोहोचल्यानंतर व्यवस्थापनाने अंतर्गत चर्चा केली. त्यानंतर कंपनीने सार्वजनिक निवेदन जारी करत संबंधित कर्मचाऱ्याचे वक्तव्य कंपनीच्या मूल्यांच्या विरोधात असल्याचे नमूद केले आणि त्याला नोकरीवरून काढून टाकल्याची माहिती दिली.

सलमान खान भावुक! कुमुद राणेच्या निधनानंतर सोहेल खानची इमोशनल पोस्ट चर्चेत, नेमकं काय होतं खान कुटुंबाशी नातं?

नेमका वाद काय?
हा संपूर्ण वाद विनोदी कलाकार प्रणीत मोरेच्या लाईव्ह स्टँड-अप शोदरम्यान घडलेल्या एका संवादामुळे सुरू झाला. प्रेक्षकांशी बोलताना एका तरुणाने त्याच्या डेटिंगचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्याने एका मुलीसोबत डेटवर गेल्यानंतर तिच्यासाठी 370 रुपयांची चिकन बिर्याणी घेतल्याचे सांगितले.

यानंतर त्याने केलेल्या एका आक्षेपार्ह आणि लैंगिक स्वरूपाच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत ते महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि संबंधित तरुणावर टीकेचा भडिमार सुरू झाला.

Katrina Kaif Next Project: आई झाल्यानंतर कतरिना कैफचा मोठा कमबॅक? OTT वर पदार्पणाची रंगली चर्चा, चाहत्यांमध्ये उत्सुकता

या प्रकरणानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्या तरुणाची ओळख शोधून काढली. त्याचे व्यावसायिक तपशील समोर आल्यानंतर तो ज्या कंपनीत काम करत होता, त्या कंपनीनेही या प्रकरणाची दखल घेतली. अखेर कंपनीने त्याचे वक्तव्य त्यांच्या मूल्यांच्या विरोधात असल्याचे सांगत त्याला नोकरीवरून काढून टाकले.यानंतर संबंधित तरुण आणि प्रणीत मोरे यांनी माफी मागितली असली तरी हा वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Pranit more controversy uproar over the 370 biryani remark company fires young man over controversial comment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Pranit More
  • Stand-Up Comedian

संबंधित बातम्या

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ
1

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!
2

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
3

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!
4

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.