Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Box Office Collection: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; भाऊबीजला केली छप्परफाड कमाई

Ramayana Box Office Collection:रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड सुरू आहे. सात दिवसांत जगभरात ९३४ कोटींची कमाई करत चित्रपट १००० कोटींच्या क्लबच्या जवळ पोहोचला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 12, 2026 | 11:00 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Box Office Collection: रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘रामायण’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. दिवाळीनंतर भाऊबीजेच्या दिवशीही चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. याचा मोठा फायदा चित्रपटाच्या कमाईला झाला आहे. अवघ्या सात दिवसांत ‘रामायण’ने जगभरात ९०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून आता चित्रपट १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यापासून काही पावलं दूर आहे. विशेष म्हणजे, भारतातही या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांहून अधिक निव्वळ कमाई केली आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित या बिग बजेट चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप सुरूच आहे. सणासुदीच्या सुट्ट्यांमध्ये चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली. भाऊबीजेची सुट्टी संपल्यानंतरही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली. चला जाणून घेऊया, प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी ‘रामायण’ने किती कमाई केली आणि १००० कोटींच्या टप्प्यापासून हा चित्रपट किती दूर आहे.

सातव्या दिवशीही ‘रामायण’ची दमदार कमाई

बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारतात ७०.६५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचे सात दिवसांचे एकूण देशांतर्गत नेट कलेक्शन ५११.१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शन ६११.०५ कोटी रुपये झाले आहे.

परदेशी बाजारपेठांमध्येही रणबीर कपूरच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातव्या दिवशी परदेशात २५ कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने आतापर्यंत एकूण ३२३.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे ‘रामायण’ची जगभरातील एकूण कमाई ९३४.५५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आता १००० कोटींचा आकडा गाठण्यासाठी चित्रपटाला आणखी सुमारे ६५.४५ कोटी रुपयांची कमाई करावी लागणार आहे.

पहिल्या आठवड्यात कशी राहिली कमाई?

‘रामायण’च्या पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवरील कमाईत चढ-उतार पाहायला मिळाले. गुरुवारी चित्रपटाने ६४.८५ कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईसह दमदार सुरुवात केली. मात्र, शुक्रवारी कमाईत सुमारे २५.९ टक्क्यांची घट झाली आणि चित्रपटाने ४८.०५ कोटी रुपये कमावले.

यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ झाली. शनिवारी ६९.८० कोटी, तर रविवारी ५६.१५ कोटी रुपयांची कमाई झाली. सोमवारी चित्रपटाने मोठी झेप घेत १०७.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मंगळवारीही चित्रपटाची घोडदौड कायम राहिली आणि ९४.१० कोटी रुपयांची कमाई झाली.

भाऊबीजेच्या सुट्टीनंतर बुधवारी चित्रपटाच्या कमाईत सुमारे २४.९ टक्क्यांची घट झाली असली, तरी ७०.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात चित्रपट यशस्वी ठरला.

Kareena Kapoor: करीना कपूरच्या दिवाळी लूकवरून वाद; कुराणातील आयत असलेल्या ३० कॅरेटच्या पेंडंटवरून अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस

दक्षिण भारतीय डब आवृत्तीनेही रचला इतिहास

‘रामायण’ने केवळ हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येच नव्हे, तर दक्षिण भारतीय बाजारपेठेतही आपली छाप पाडली आहे. चित्रपटाच्या दक्षिण भारतीय डब आवृत्तीने १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. असा विक्रम करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरल्याचा दावा करण्यात येत आहे.

एकंदरीत, रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड पाहता लवकरच हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा पार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Saif Ali Khan Fitness: वयाच्या ५६व्या वर्षी सैफ अली खानचा जबरदस्त फिटनेस; सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Web Title: Ramayana box office collection 7 days worldwide 934 crore ranbir kapoor movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Shashank Shende: पैशांसाठी रक्ताची नातीही विसरतो माणूस! ‘अफरातफरी’च्या कथेबद्दल शशांक शेंडेंनी मांडले परखड मत
1

Shashank Shende: पैशांसाठी रक्ताची नातीही विसरतो माणूस! ‘अफरातफरी’च्या कथेबद्दल शशांक शेंडेंनी मांडले परखड मत

Kareena Kapoor: करीना कपूरच्या दिवाळी लूकवरून वाद; कुराणातील आयत असलेल्या ३० कॅरेटच्या पेंडंटवरून अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस
2

Kareena Kapoor: करीना कपूरच्या दिवाळी लूकवरून वाद; कुराणातील आयत असलेल्या ३० कॅरेटच्या पेंडंटवरून अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस

Saif Ali Khan Fitness: वयाच्या ५६व्या वर्षी सैफ अली खानचा जबरदस्त फिटनेस; सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल
3

Saif Ali Khan Fitness: वयाच्या ५६व्या वर्षी सैफ अली खानचा जबरदस्त फिटनेस; सूर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Gana Dhav Re Trailer: केदार शिंदेंच्या ‘गणा धाव रे’चा ट्रेलर प्रदर्शित; बाप्पाच्या कथेने जिंकले मन
4

Gana Dhav Re Trailer: केदार शिंदेंच्या ‘गणा धाव रे’चा ट्रेलर प्रदर्शित; बाप्पाच्या कथेने जिंकले मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.