Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana : भारतीय संस्कृतीचा जागतिक डंका! ‘रामायणम्’च्या भव्य विश्वाची नमित मल्होत्रांनी शेअर केली झलक

Ramayana : नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायणम्’चा व्हिजन व्हिडीओ रिलीज झाला आहे. भारतीय सांस्कृतिक वारसा, आधुनिक तंत्रज्ञान, थीम पार्क्स आणि संग्रहालयांच्या माध्यमातून हे विश्व मोठ्या पडद्यापलीकडे नेण्याची संकल्पना समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 28, 2026 | 10:30 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana : ‘रामायणम्’चे विश्व हे केवळ मोठ्या पडद्यापुरते मर्यादित नसून त्यापेक्षाही अधिक व्यापक आणि भव्य आहे. याच भव्य संकल्पनेची झलक प्रेक्षकांना दाखवण्यासाठी नमित मल्होत्रा यांनी आपला खास व्हिजन व्हिडिओ प्रदर्शित केला आहे.

भारतीय महाकाव्य ‘रामायण’ आता नव्या रूपात जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. निर्माता नमित मल्होत्रा यांच्या बहुचर्चित ‘रामायणम्’ चित्रपटामागील व्यापक संकल्पना उलगडणारा व्हिजन व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडीओमधून केवळ भव्य चित्रपट साकारण्यापुरते मर्यादित न राहता, भारतीय सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक मनोरंजन यांची सांगड घालणारे एक विशाल विश्व निर्माण करण्याचा दृष्टिकोन समोर आला आहे.

मोठ्या पडद्यापलीकडे साकारणार ‘रामायणम्’चे विश्व

‘रामायणम्’ ही केवळ एका चित्रपटाची संकल्पना नसून, या महाकाव्याशी विविध पिढ्यांमधील प्रेक्षकांना जोडण्याचा व्यापक प्रयत्न असल्याचे व्हिजन व्हिडीओतून दाखवण्यात आले आहे. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेत, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या कथाकथन पद्धतींच्या माध्यमातून ही महागाथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची योजना आहे.

या संकल्पनेनुसार, प्रेक्षक केवळ चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर विविध माध्यमांतून ‘रामायणम्’च्या विश्वाशी जोडले जाऊ शकतील. थीम पार्क्स, संग्रहालये आणि अनुभवाधारित ठिकाणांसारख्या माध्यमांचाही या व्यापक दृष्टिकोनात समावेश करण्यात आला आहे.

भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणार रामायणातील मूल्ये

रामायणातील कथा, व्यक्तिरेखा आणि जीवनमूल्ये नव्या पद्धतीने सादर करून ती जगभरातील भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, हा या संकल्पनेचा महत्त्वाचा भाग आहे. भारतीय परंपरेतील या अजरामर महाकाव्याशी नव्या पिढीचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी, असा या प्रकल्पामागील उद्देश असल्याचे व्हिजन व्हिडीओतून सूचित होते.

या घोषणेसोबतच चित्रपटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमधून ‘रामायणम्’च्या व्यापक संकल्पनेची झलक पाहायला मिळते. हा व्हिजन व्हिडीओ जिओहॉटस्टारवरही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

रणबीर कपूर श्रीराम, तर यश साकारणार रावण

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम्’मध्ये बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सनी देओल हनुमान आणि रवि दुबे लक्ष्मण यांच्या भूमिका साकारणार आहेत.

या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने DNEG आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने केली आहे. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि भव्य निर्मितीमूल्यांमुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Gondhal Marathi Movie: भारताची ऑस्कर एंट्री ठरलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही आली समोर

दोन भागांत प्रदर्शित होणार ‘रामायणम्’

‘रामायणम्’ दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

भारताबाहेरील वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्स सांभाळणार असून, हिंदी भाषिक बाजारपेठेतील वितरण धर्मा प्रॉडक्शन्सकडे असेल. हा चित्रपट जगभरातील IMAX थिएटर्समध्येही प्रदर्शित करण्याची योजना आहे. चित्रपटातील गाणी टी-सीरिजच्या लेबलअंतर्गत प्रसिद्ध केली जाणार आहेत.

‘रामायणम्’च्या व्हिजन व्हिडीओमुळे या चित्रपटामागील व्यापक संकल्पनेची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय सांस्कृतिक वारसा, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावरील सिनेमाचा अनुभव यांची सांगड घालत रामायणाची महागाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा नमित मल्होत्रा यांचा प्रयत्न या घोषणेतून अधोरेखित झाला आहे.

Imran Khan: इमरान खानला हायकोर्टाचा दिलासा, भारत सोडण्याच्या नोटीसवर तात्पुरती ब्रेक,न्यायालयात नेमकं काय घडलं?

Web Title: Ramayana namit malhotra shares bts vision video ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • bollywood Flim
  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘नाम फाऊंडेशन’चं काय होणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
1

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘नाम फाऊंडेशन’चं काय होणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Gondhal Marathi Movie: भारताची ऑस्कर एंट्री ठरलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही आली समोर
2

Gondhal Marathi Movie: भारताची ऑस्कर एंट्री ठरलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही आली समोर

Bharat Jadhav:’ही’ भूमिका साकारताना भरत जाधव यांनाही आलं होतं टेन्शन; पहिल्या कोर्टरूम सीनचा सांगितला अनुभव
3

Bharat Jadhav:’ही’ भूमिका साकारताना भरत जाधव यांनाही आलं होतं टेन्शन; पहिल्या कोर्टरूम सीनचा सांगितला अनुभव

Dhurandhar: खाडी देशांत रिलीज नाही, ‘A’ प्रमाणपत्राची मर्यादा; तरीही रणवीर सिंहच्या चित्रपटाची चर्चा, जाणून घ्या ७ कारणं
4

Dhurandhar: खाडी देशांत रिलीज नाही, ‘A’ प्रमाणपत्राची मर्यादा; तरीही रणवीर सिंहच्या चित्रपटाची चर्चा, जाणून घ्या ७ कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.