Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Trailer Out: “अपनी सीता को वापस लाऊंगा!” रणबीर कपूरचा प्रभू श्रीराम अन् यशचा रौद्र रावण; ‘रामायण’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित

Ramayana Trailer Out: नमित मल्होत्रांच्या 'रामायण: पार्ट १'चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश यांच्या प्रमुख भूमिका असून हॅन्स झिमर-ए.आर. रहमानचं संगीत आणि भव्य VFXमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 30, 2026 | 08:34 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Trailer Out: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण: पार्ट १’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित अधिकृत ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे(Ramayana Trailer Out) . ३० जुलै २०२६ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भारतीय भाषांमध्ये ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. दिवाळी २०२६ मध्ये हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून त्याचे जागतिक वितरण सोनी पिक्चर्स करणार आहे. उत्तर भारतातील वितरणाची जबाबदारी धर्मा प्रोडक्शन्सकडे सोपवण्यात आली आहे.

निर्माता नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओज, आठ वेळा ऑस्कर विजेत्या VFX स्टुडिओ DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहनिर्मितीत साकारलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून आणि चित्रपटप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून त्याच्या भव्यतेचे आणि दृश्य परिणामांचे विशेष कौतुक केले जात आहे.

राम आणि रावणाच्या महासंग्रामाची भव्य झलक

ट्रेलरमध्ये भगवान राम आणि रावण यांच्यातील धर्म-अधर्माच्या संघर्षाची भव्य मांडणी करण्यात आली आहे. रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत संयमी, शांत आणि तेजस्वी दिसत आहे, तर रॉकिंग स्टार यश रावणाच्या भूमिकेत अत्यंत प्रभावी आणि दमदार वाटतो. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार असून आणि रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

चित्रपटात भगवान विष्णूंचा रामावतार, वनवास, सीतेचे अपहरण आणि पुढे घडणाऱ्या महासंग्रामाची सुरुवात प्रभावी दृश्यांमधून दाखवण्यात आली आहे. भव्य सेट्स, उत्कृष्ट VFX आणि सिनेमॅटिक सादरीकरणामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांना हॉलीवूड दर्जाचा अनुभव देतो, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

दिग्गज कलाकारांचा फौज

चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि रवि दुबे यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अरुण गोविल राजा दशरथ, लारा दत्ता कैकेयी, अजिंक्य देव ऋषी विश्वामित्र, कुणाल कपूर भगवान इंद्र आणि रकुल प्रीत सिंग शूर्पणखा यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

संगीत आणि तंत्रज्ञानाचा जागतिक मिलाफ

चित्रपटाची पटकथा श्रीधर राघवन यांनी लिहिली असून संगीताची जबाबदारी ऑस्कर विजेते हॅन्स झिमर आणि ए. आर. रहमान यांनी सांभाळली आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार व तंत्रज्ञांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारण्यात आला असून दृश्य परिणामांसाठी DNEGच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Karishma Tanna : गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळाली गुडन्यूज! अभिनेत्रीच्या घरात हलला पाळणा; बंगेरा कुटुंबात नवा पाहुणा

नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांची भूमिका

निर्माता नमित मल्होत्रा यांनी ‘रामायण’ ही केवळ कथा नसून भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत, ही महागाथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत भव्य स्वरूपात पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

तर दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी ‘रामायण’ ही संपूर्ण मानवजातीची कथा असून तिच्या भावना, मूल्ये आणि परंपरेचा आदर राखत सर्वोच्च दर्जाचा सिनेमाई अनुभव देण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.

ट्रेलरला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘रामायण: पार्ट १’ हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरणार असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू झाली आहे.

Ram Gopal Varma : ‘परीक्षेत AI टूल्सना परवानगी..’, अँटी-पेपर लीक विधेयकावर राम गोपाल वर्मांचा सरकारला मोठा सल्ला

Web Title: Ramayana trailer out namit malhotras movie part 1 trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • bollywood Flim
  • ranbir kapoor
  • Sai Pallavi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.