Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yash Ravan Look: ३३ किलोचे कवच अन् १.८ किलोचा मुकुट; ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कठोर मेहनत

Yash Ravan Look: नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशला ३३ किलोचा जड पोशाख परिधान करावा लागला. त्याच्या १.८ किलोच्या मुकुटामागील मेहनतही आली समोर.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 10, 2026 | 12:35 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Yash Ravan Look:  दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या लूकची आणि भूमिकांचीही जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर दाक्षिणात्य अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, यशचा रावणाच्या रूपातील लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आता या लूकमागील मेहनतीचे अनेक रंजक तपशील समोर आले आहेत.

चित्रपटाच्या कॉस्च्युम स्टायलिस्ट आणि डिझायनर सानिया यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यशच्या रावणाच्या पोशाखाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रावणाच्या भूमिकेसाठी यशला तब्बल ३३ किलो वजनाचा पोशाख परिधान करावा लागत होता. यामध्ये कपडे, दागिने, चिलखत आणि इतर डिझाइन घटकांचा समावेश होता. एवढंच नाही, तर त्याच्या मुकुटाचे वजनही जवळपास १.८ किलो होते.

रावणाचा पोशाख तयार करणं होतं मोठं आव्हान

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सानिया यांनी सांगितले की, रावणाच्या काही खास पोशाखांचे वजन ३० ते ३३ किलोपर्यंत होते. यामध्ये लंकेशी संबंधित पोशाख, रावणाचा लग्नाचा पोशाख आणि शूर्पणखेच्या लग्नात परिधान केलेला पोशाख यांचा समावेश होता. दागिन्यांसह इतर बहुतांश पोशाखांचे वजन साधारण १६ ते २० किलो होते.

रावणाच्या लूकमधील सर्वात कठीण भाग म्हणजे त्याचा मुकुट तयार करणे. सुरुवातीला यासाठी अनेक ३डी मुकुट तयार करण्यात आले आणि त्यानंतर त्याचे अंतिम डिझाइन निश्चित करण्यात आले. मुकुटाचे वजन कमी करण्यासाठीही अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र, तो १.८ किलोपेक्षा हलका करता आला नाही. एवढा जड मुकुट असूनही यशच्या चेहऱ्यावरील हावभावांमधून त्याला होणारा त्रास जाणवत नव्हता, असे सानिया यांनी सांगितले.

Suraj Chavan: सूरज चव्हाणने दाखवला दोन महिन्यांच्या लेकीचा चेहरा; दिवाळीत केलं कन्या पूजन, पत्नी संजनाचेही धुतले पाय

प्रत्येक शॉटनंतर यश काढायचा पोशाखाचे काही भाग

एवढ्या जड पोशाखात चित्रीकरण करणे यशसाठी अजिबात सोपे नव्हते. प्रत्येक शॉटनंतर तो पोशाखाचे काही भाग काढून ठेवत असे. मुकुट घातल्यानंतर मान हलवणे, छातीवर चिलखत आणि खांद्यांवर जड रचना असताना हातांची हालचाल करणे, ही मोठी कसरत होती. प्रत्येक हालचाल नैसर्गिक दिसावी, यासाठी यशला अनेकदा शॉट द्यावे लागत होते.

पोशाख शक्य तितका आरामदायक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याचे वजन आणि सर्व भाग एकमेकांशी योग्य प्रकारे जुळवून घेणे हे मोठे आव्हान होते. असे असूनही यशने संपूर्ण चित्रीकरणादरम्यान उत्साह कायम ठेवला. त्यामुळे पडद्यावर रावणाची भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी यशने किती मेहनत घेतली आहे, याची कल्पना या तपशीलांवरून येते.

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार

Web Title: Yash ravan look 33 kg costume 1 8 kg crown ramayana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • bollywood movies
  • entertainment
  • Yash

संबंधित बातम्या

Navrashtra Exclusive: निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्करचा लग्नानंतरचा पहिला पाडवा; पाहा नवदाम्पत्याचे सुंदर फोटो!
1

Navrashtra Exclusive: निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्करचा लग्नानंतरचा पहिला पाडवा; पाहा नवदाम्पत्याचे सुंदर फोटो!

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार
2

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार

Suraj Chavan: सूरज चव्हाणने दाखवला दोन महिन्यांच्या लेकीचा चेहरा; दिवाळीत केलं कन्या पूजन, पत्नी संजनाचेही धुतले पाय
3

Suraj Chavan: सूरज चव्हाणने दाखवला दोन महिन्यांच्या लेकीचा चेहरा; दिवाळीत केलं कन्या पूजन, पत्नी संजनाचेही धुतले पाय

Pawan Kalyan: १३ वर्षांचा संसार मोडला! साऊथ सुपरस्टार पवन कल्याण आणि पत्नी अण्णा कोनिडेला विभक्त होणार
4

Pawan Kalyan: १३ वर्षांचा संसार मोडला! साऊथ सुपरस्टार पवन कल्याण आणि पत्नी अण्णा कोनिडेला विभक्त होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.