Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीच्या आई कृष्णा मुखर्जी यांचं वयाच्या ७५व्या वर्षी निधन झालं आहे. कुटुंबीयांनी निवेदन जारी करून निधनाची माहिती दिली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 22, 2026 | 03:52 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Rani Mukerji Mother Death : बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या आई कृष्णा मुखर्जी यांचं वयाच्या ७५व्या वर्षी निधन झालं आहे. मुखर्जी कुटुंबीयांनी मंगळवारी निवेदन जारी करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाला दुजोरा देत हा आपल्यासाठी अत्यंत कठीण आणि दु:खाचा काळ असल्याचं म्हटलं आहे. तसेच या कठीण प्रसंगी कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. कृष्णा मुखर्जी यांच्यासाठी मिळालेलं प्रेम, प्रार्थना आणि पाठिंबा याबद्दल कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

राणी मुखर्जी आईच्या खूप जवळ होती

राणी मुखर्जी तिच्या आईच्या खूप जवळ होती. अनेक प्रसंगी तिने आपल्या आईसोबतच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं आहे. कृष्णा मुखर्जी या राणीसाठी केवळ आई नव्हत्या, तर तिच्या आयुष्यातील आणि अभिनयाच्या प्रवासातील महत्त्वाची प्रेरणा होत्या.

राणीच्या अभिनय कारकिर्दीत आईचा प्रभाव अनेकदा पाहायला मिळाला आहे. विशेषतः ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील भूमिका साकारताना तिला आईकडून मोठी प्रेरणा मिळाली होती.

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’साठी आईकडून घेतली प्रेरणा

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’मध्ये राणीने आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बंगाली आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने मूळ कथेशी संबंधित माहिती आणि संदर्भांचा अभ्यास केला होता. मात्र, पात्राला स्वतःची बाजू देताना तिच्या आईचा वैयक्तिक प्रभावही महत्त्वाचा ठरला.

२०२३ मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राणीने आपल्या आईकडून मिळालेल्या प्रेरणेबद्दल सांगितलं होतं. तिच्या मते, कृष्णा मुखर्जी या बंगाली संस्कृतीचं अतिशय मजबूत प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती होत्या.

मुलांना स्वतःच्या हाताने खाऊ घालणं, कपाळावर टिळक लावणं आणि घरातील छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं अशा आईच्या सवयी राणीने या भूमिकेसाठी जवळून पाहिल्या होत्या. आपल्या आईकडून या पात्रासाठी ताकद आणि प्रेरणा मिळाल्याचं तिने सांगितलं होतं.

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं

कृष्णा मुखर्जी यांचं चित्रपटसृष्टीशीही होतं खास नातं

कृष्णा मुखर्जी यांचं चित्रपटसृष्टीशी असलेलं नातं केवळ राणी मुखर्जीच्या आईपुरतं मर्यादित नव्हतं. त्या माजी पार्श्वगायिका होत्या आणि त्यांनी संगीत क्षेत्रात काम केलं होतं. त्यामुळे राणीचं बालपणही सिनेमा आणि संगीताच्या वातावरणात गेलं.

कृष्णा मुखर्जी यांचा विवाह चित्रपट निर्माते राम मुखर्जी यांच्याशी झाला होता. राम मुखर्जी यांचा हिंदी चित्रपटसृष्टीशी दीर्घ संबंध होता. ते फिल्मालय स्टुडिओच्या सह-संस्थापकांपैकी एक होते. २०१७ मध्ये राम मुखर्जी यांचं निधन झालं.

आईच्या निधनाने राणीवर दु:खाचा डोंगर

राणी मुखर्जीने आपल्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्यात आई कृष्णा मुखर्जी यांचं स्थान नेहमीच खास राहिलं. राणीच्या अभिनय प्रवासात कृष्णा यांनी तिच्या कामाचा जवळून पाठपुरावा केला आणि आपल्या अनुभवातून तिला सतत प्रेरणा दिली.

आईकडून मिळालेली मूल्यं आणि कुटुंबातील संस्कार हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असल्याचं राणीच्या याआधीच्या वक्तव्यांमधून स्पष्ट झालं आहे. आता कृष्णा मुखर्जी यांच्या निधनानंतर मुखर्जी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात कुटुंबीयांनी चाहत्यांना आणि जनतेला त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे.

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Web Title: Rani mukerji mother krishna mukerji death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Death
  • mom
  • Rani Mukerji

संबंधित बातम्या

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
1

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.