
Bus Accident: "पिशवीत सापडलेल्या टाचण्या, लिंबू अन् सिमकार्ड..." नाशिकच्या द्वारका चौकातील काळजाचा ठोका चुकवणारा अपघात...
सुरेखा जाधव या नाशिकच्या उपनगर भागात वास्तव्यास होत्या. त्या शनिवारी (दि. ७) न्यायालयाच्या कामानिमित्त येवला येथे गेल्या होत्या. दिवसभराचे काम आटोपून ‘आता लवकर घरी जाऊन कुटुंबासोबत सणाचा आनंद घेऊया,’ या अपेक्षेने त्या नाशिकला परतल्या. मात्र, द्वारका चौकात रस्ता ओलांडत असताना मालेगावहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने (एमएच १४, एनई ४७२४) त्यांना जोरदार धडक दिली आणि पुढच्या चाकाखाली चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की बघणाऱ्यांच्या अंगावर काटा आला.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. बसखाली अडकलेला छिन्नभिन्न मृतदेह बाहेर काढण्यासाठी भद्रकाली पोलिसांना स्थानिक रिक्षाचालकांची मदत घ्यावी लागली. मृतदेह तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, परंतु अवस्था अत्यंत वाईट असल्याने ओळख पटवण्यात मोठा अडथळा निर्माण झाला. पोलिसांनी महिलेच्या पिशवीची पाहणी केली असता त्यात काही रक्कम, डायरी, लिंबू आणि टाचण्या आढळून आल्या. महिलेचा मोबाईल फुटलेला असल्याने पोलिसांनी त्यातील सिमकार्ड काढून दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकले आणि डायरीतील क्रमांकांवर संपर्क साधला. अखेर सुनेशी संपर्क झाल्यानंतर मिळालेल्या वर्णनावरून मृत महिला सुरेखा जाधव असल्याचे निष्पन्न झाले. ऐन सणाच्या तोंडावर कुटुंबातील कर्त्या महिलेचा असा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Ans: मृत महिलेचे नाव सुरेखा जाधव (वय ५४, रा. उपनगर, नाशिक) असे आहे.
Ans: हा भीषण अपघात नाशिक शहरातील द्वारका चौकात रस्ता ओलांडताना घडला.
Ans: महिलेच्या पिशवीतील फुटलेल्या मोबाईलचे सिमकार्ड दुसऱ्या फोनमध्ये टाकून डायरीतील क्रमांकावरून सुनेशी संपर्क साधल्यानंतर ओळख पटली.