
फोटो सौजन्य - Social Media
दिग्दर्शक जय मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली ‘प्रलय’चे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्याचे चित्रीकरण दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रणवीर दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर काही काळ कामापासून दूर राहणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीला नियोजित ब्रेक देण्यात येणार असून उर्वरित शूटिंग २०२७ मध्ये पुन्हा सुरू होईल.
‘प्रलय’ची कथा आणि पटकथा जय मेहता व लूटेरे वेब सीरिजसाठी प्रसिद्ध असलेले विशाल कपूर यांनी संयुक्तपणे लिहिली आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप फारशी माहिती उघड करण्यात आलेली नसली, तरी हा एक झॉम्बी थ्रिलर असल्याचे सांगितले जात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत हा प्रकार फारसा पाहायला मिळत नसल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘प्रलय’ हा रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ नंतरचा आणखी एक महत्त्वाकांक्षी चित्रपट मानला जात आहे. अॅक्शनपटांमध्ये यश मिळवल्यानंतर आता तो झॉम्बी थ्रिलर या नव्या शैलीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, रणवीर सिंग किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी शूटिंगचे वेळापत्रक अथवा पॅटर्निटी लिव्हबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.