(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Tejashri Pradhan Buys New Mercedes Car : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या तेजश्रीने नुकतीच एक आलिशान मर्सिडीज कार खरेदी केली असून, महिन्याभरानंतर तिने सोशल मीडियावर नव्या गाडीची पहिली झलक दाखवली आहे. तेजश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असून तिचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे.
तेजश्रीने तिच्या Birthday Month मध्ये ही नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. तेजश्रीने जवळपास एक महिन्यापूर्वी ही कार खरेदी केली होती. तिने आज महिन्याभराने नवीन कारची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ड्रायव्हिंग सीटवर बसून तिने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तेजश्री पिस्ता रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत आहे.
तेजश्री ने नव्या आलिशान गाडीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर करत लिहिले, “…आणि जवळपास एक महिना उलटून गेलाय… माझा प्रवास आता अधिक सुखद होत चालला आहे!” या कॅप्शनसोबत तिने (Evil Eye) इमोजी शेअर करत देवाचे आभार मानले. नव्या गाडीमुळे आयुष्यातील हा प्रवास आणखी सुंदर झाल्याची भावना तिने व्यक्त केली. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून, नव्या मर्सिडीजसाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांसह कलाकरांनी देखील तिचे अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री रूपाली भोसले लिहिते, ”Yee वेलकम टू द क्लब.. तुझं अभिनंदन! यासह प्रसाद जवादे, रेश्मा शिंदे यांसारख्या अनेक कलाकार मंडळींनी तिचे अभिनंदन केलं आहे.
View this post on Instagram
तेजश्रीने आजवर होणार सून मी ह्या घरची, प्रेमाची गोष्ट, अग्गंबाई सासूबाई अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तेजश्री सध्या वीण दोघांतली ही तुटेना या झी मराठीच्या मालिकेत स्वानंदीची प्रमुख भूमिका साकारत आहे.






