
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मीका मंदाना लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी स्वतः विजय आणि रश्मीकाने दिली आहे. बातमी देण्याची पद्धत जरा निराळी आहे. अगदी गोंडस पद्धतीने त्या दोघांनी ही आनंददायी खबर त्यांच्यात्यांच्या चाहत्यांना दिली आहे. अशी काय स्टोरी त्यांनी पोस्ट केली आहे, चला तर मग जाणून घेऊयात.
काय आहे Rashmika Mandana आणि Vijay Deverkonda ची इंस्टाग्राम स्टोरी?
अभिनेत्री रश्मीका मंदाना आणि विजय डेव्हरकोंडाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामध्ये असे नमूद आहे की, “Before we made any plans. before we chose anything for ourselves – you were already there. With so much love, you gave us a name. You called us “VIROSH”. So today with full hearts. we name our coming together in your honour. We would like to name it “The Wedding of VIROSH. Thank you for holding us with so much love. You are a part of us- always. Biggest hugs and full love!”
चाहत्यांसाठी ही पोस्ट असून यात रश्मीका आणि विजयने लिहले आहे की, “आम्ही योजना आखण्याच्या आधी, काही ठरवण्याच्या आधीपासूनच तुम्ही आमच्यासोबत होता. खूप साऱ्या प्रेमाने तुम्ही आम्हाला एक नाव दिलंत “VIROSH”. म्हणून आज, आमच्या मनापासून आम्ही आमच्या या खास प्रवासाला तुमच्या सन्मानार्थ नाव देत आहोत “The Wedding of VIROSH”. इतकं निःस्वार्थ प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी फक्त चाहते नाही, तर आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात, कायमचा! खूप साऱ्या मिठ्या आणि मनापासून प्रेम!”
कधी आहे लग्न?
विजय आणि रश्मीका २६ फेब्रुवारी रोजी उदयपूर येतील एका हेरिटेज महालात शाही विवाहसोहळा पार पडणार आहेत. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी साखरपुढा हुरकला आता ४ मार्च रोजी हैद्राबाद येथे त्यांचे रिसेप्शन पार पाडणार आहेत.