Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranabaali OTT Release: घरबसल्या पाहा रश्मिका-विजयचा ‘रणबाली’; कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी होणार रिलीज?

Ranabaali OTT Release: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा ‘रणबाली’ चित्रपट १३ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तेलुगू, हिंदीसह पाच भाषांमध्ये घरबसल्या पाहता येणार.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2026 | 08:28 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ranabaali OTT Release: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला ‘रणबाली’ हा पीरियड अॅक्शन चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या आत हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. विशेष म्हणजे, मूळ तेलुगू भाषेतील या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही घेता येणार आहे.

दिग्दर्शक राहुल संकृतियन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून मैत्री मूव्ही मेकर्सने त्याची निर्मिती केली आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. त्यानुसार, ‘रणबाली’ १३ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. त्यामुळे थिएटरमध्ये चित्रपट पाहता न आलेल्या प्रेक्षकांना आता घरबसल्या तो पाहण्याची संधी मिळणार आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘रणबाली’ची निराशाजनक कामगिरी

लग्नानंतर पहिल्यांदाच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसल्याने ‘रणबाली’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नाही. १२० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे ८०.८० कोटी रुपयांची कमाई केली. त्याच काळात प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ चित्रपटाने मात्र जगभरात ८२८.५० कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

Ranveer Singh: फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज

काय आहे ‘रणबाली’ची कथा?

‘रणबाली’ची कथा १९व्या शतकातील ब्रिटिश राजवटीच्या काळात दक्षिण भारतातील रायलसीमा प्रदेशात घडते. सिंगणमाला गावातील रणबाली म्हणजेच विजय देवरकोंडा याच्या आयुष्याभोवती चित्रपटाचं कथानक फिरतं. गूढ परिस्थितीत जन्मलेल्या रणबालीच्या आयुष्याबद्दल एक आध्यात्मिक भविष्यवाणी केली जाते. आपलं ठरलेलं ध्येय पूर्ण होईपर्यंतच तो जिवंत राहील, असं या भविष्यवाणीत सांगितलं जातं.

मोठा झाल्यानंतर रणबाली एक पराक्रमी योद्धा बनतो. पुढे त्याचं जयम्मा म्हणजेच रश्मिका मंदाना हिच्याशी लग्न होतं. तिच्या आयुष्यात येण्याने रणबालीच्या कठोर स्वभावामागील हळवी बाजू समोर येते. दरम्यान, रायलसीमा प्रदेशात १८७६ ते १८७८ या काळात भीषण दुष्काळ पडतो. अन्नटंचाई आणि ब्रिटिशांच्या जाचक करांमुळे स्थानिक नागरिकांचे हाल होतात. मात्र, ब्रिटिश अधिकारी धान्य निर्यात आणि कर वसुली सुरूच ठेवतात. या अन्यायाविरोधात रणबाली कसा उभा राहतो, हे चित्रपटात पाहायला मिळतं.

Divyanka Tripathi Building Fire: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीत भीषण आग; थोडक्यात बचावली, पण कुटुंबावर दुःखाचा डोंगर

थिएटरमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता ‘रणबाली’ला ओटीटीवर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. १३ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये पाहता येईल.

Web Title: Ranabaali ott release date netflix vijay deverakonda rashmika mandanna ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • entertainment
  • OTT
  • rashmika mandanna
  • vijay devarkonda

संबंधित बातम्या

Ranveer Singh:फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज
1

Ranveer Singh:फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज

Kiara Advani-Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राचा बेडरूम रूल चर्चेत; कियाराने ‘ही’ कृती करत दिले मजेशीर उत्तर!
2

Kiara Advani-Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राचा बेडरूम रूल चर्चेत; कियाराने ‘ही’ कृती करत दिले मजेशीर उत्तर!

Janhavi Tambat Exclusive: पहिला पाडवा, पहिली दिवाळी अन् प्रेमाची कबुली! जान्हवी तांबटने सांगितले छवीच्या आयुष्यात काय घडणार?
3

Janhavi Tambat Exclusive: पहिला पाडवा, पहिली दिवाळी अन् प्रेमाची कबुली! जान्हवी तांबटने सांगितले छवीच्या आयुष्यात काय घडणार?

Ranbir Kapoor Ramayana Armour: सोनं-चांदी नाही, बांबू-रबरपासून बनवलं रणबीर कपूरचं कवच; १५ कारागिरांची साडेतीन वर्षांची मेहनत!
4

Ranbir Kapoor Ramayana Armour: सोनं-चांदी नाही, बांबू-रबरपासून बनवलं रणबीर कपूरचं कवच; १५ कारागिरांची साडेतीन वर्षांची मेहनत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.