
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘बिग बॉस २०’च्या मंचावर तमन्ना बोलत असताना सलमान खानने अचानक सिद्धार्थ मल्होत्राकडे पाहिलं आणि तिच्या आवाजाचं कौतुक केलं.
सलमान म्हणाला, “काय अप्रतिम आवाज आहे तिचा यार.” सलमानकडून अचानक झालेलं कौतुक ऐकून तमन्ना लाजली आणि तिने त्याचे आभार मानले. या छोट्याशा क्षणाने मंचावरील वातावरणही हलकंफुलकं झालं.
‘द व्वान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’मधील ‘समझो ना’ हे गाणंही चर्चेत आहे. या गाण्याला यूट्यूबवर ५५ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. विविध भाषांमध्ये हे गाणं यूट्यूबवर ट्रेंड झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.
गाण्यातील सिद्धार्थ आणि तमन्नाची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यासोबतच चित्रपटातील ‘छठी मैया’ गाण्यात तमन्नाने छठ पूजेच्या विधींचं केलेलं सादरीकरणही चर्चेत आहे.
‘द व्वान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ हा मायथो-फँटसी-थ्रिलर चित्रपट असून सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि सिद्धार्थ-तमन्नाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.