Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये नेमकं काय घडलं? स्पर्धकाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; बक्षिसाच्या रकमेवरही प्रश्न

Samay Raina: समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोमधील सुभाष अहिरवारने आपण विजेता ठरल्याचा दावा केला आहे. १० पैकी १० गुण मिळूनही एपिसोड प्रदर्शित न झाल्याने त्याने समय रैनाला भावनिक आवाहन केले.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 19, 2026 | 01:21 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Samay Raina: प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा त्याच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमुळे चर्चेत आला आहे. या शोमधील सुभाष अहिरवार नावाच्या एका स्पर्धकाने आपण दुसऱ्या सीझनमध्ये विजेता ठरलो असल्याचा दावा केला आहे. मात्र, आपला एपिसोड अद्याप प्रदर्शित झालेला नसल्याने त्याने समय रैनाला भावनिक आवाहन केले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी समय रैना, बलराज घई आणि शोशी संबंधित इतरांना टॅग करत आहेत.

परीक्षकांकडून मिळाले १० पैकी १० गुण, तरीही परफॉर्मन्स प्रसारित नाही?

व्हायरल व्हिडीओमध्ये सुभाष अहिरवार भावूक झालेला दिसत आहे. त्याने दावा केला की, शोमध्ये त्याच्या परफॉर्मन्सला परीक्षकांकडून १० पैकी १० गुण मिळाले होते आणि त्याला विजेता घोषित करण्यात आले होते. यासंदर्भात त्याने व्हिडीओमध्ये एक गुणपत्रिकाही दाखवली आहे. मात्र, एवढे यश मिळूनही त्याची कामगिरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलीच नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.

आपला अनुभव सांगताना सुभाष म्हणाला, “मित्रांनो, मी ‘लॅटेंट’मध्ये गेलो होतो आणि मी विजेता आहे. माझा एपिसोड प्रसारित झालेला नाही.” त्याने समय रैनावर आपली स्वप्ने धुळीस मिळवल्याचा आरोपही केला. आपली कला प्रेक्षकांनी पाहावी आणि आपल्या कामाला ओळख मिळावी, अशी त्याची इच्छा होती.

एक लाख रुपये, फोन मिळाला; पण प्रसिद्धीची अपेक्षा अपूर्ण

सुभाषच्या म्हणण्यानुसार, एपिसोड जिंकल्यानंतर त्याला एक लाख रुपये, एक फोन आणि फूड कूपन्स अशी बक्षिसे मिळाली होती. मात्र, या भेटवस्तूंपेक्षा आपला परफॉर्मन्स प्रेक्षकांसमोर यावा, याला त्याच्यासाठी अधिक महत्त्व होते. आपली नाराजी व्यक्त करताना तो म्हणाला, “यांना काहीच अर्थ नाही. महत्त्वाच्या गोष्टी तर अजून प्रदर्शितच झालेल्या नाहीत.”

त्यामुळेच त्याने समय रैनाला हा अद्याप प्रदर्शित न झालेला एपिसोड रिलीज करण्याची विनंती केली आहे. त्याच्या या भावनिक आवाहनानंतर सोशल मीडियावर या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.

Aai Tuljabhavani Serial: महादेवांचं गुपित तुळजाईला समजलं; आता मायावी पानामुळे रंगणार अनोखा लपंडाव!

बालपणीच्या संघर्षाच्या आठवणी सांगताना झाला भावूक

या व्हिडीओमध्ये सुभाषने आपल्या बालपणीच्या संघर्षाबद्दलही सांगितले. अगदी लहान वयापासून उदरनिर्वाहासाठी त्याला कष्ट करावे लागले. आपल्या आयुष्यातील कठीण दिवस आठवताना तो म्हणाला, “माझा जन्म झाला, मी सहा-सात वर्षांचा झालो आणि भीक मागू लागलो.”

पुढे त्याने सांगितले की, वयाच्या नवव्या वर्षी ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली. १२ व्या वर्षी भाजी विकली, तर १५ व्या वर्षी मजूर म्हणून काम केले. इतका संघर्ष करून त्याने शोमध्ये आपली कला सादर केली होती. त्यामुळे त्याचा एपिसोड प्रदर्शित व्हावा, अशी त्याची इच्छा आहे. सध्या सुभाषचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून, समय रैना यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Ranbir Kapoor Ramayana Movie: १४ दिवसांत रणबीरच्या ‘रामायण’ची १५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री! जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

Web Title: Samay raina indias got talent show contestants claims cheated won episode not released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • entertainment
  • Samay Raina

संबंधित बातम्या

Sunita Ahuja New Stylish Look: सुनीता आहुजाचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; छोट्या केसांसह स्टायलिश अंदाज पाहून सून कश्मिराही फिदा!
1

Sunita Ahuja New Stylish Look: सुनीता आहुजाचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; छोट्या केसांसह स्टायलिश अंदाज पाहून सून कश्मिराही फिदा!

Aai Tuljabhavani Serial: महादेवांचं गुपित तुळजाईला समजलं; आता मायावी पानामुळे रंगणार अनोखा लपंडाव!
2

Aai Tuljabhavani Serial: महादेवांचं गुपित तुळजाईला समजलं; आता मायावी पानामुळे रंगणार अनोखा लपंडाव!

Ranbir Kapoor Ramayana Movie: १४ दिवसांत रणबीरच्या ‘रामायण’ची १५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री! जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
3

Ranbir Kapoor Ramayana Movie: १४ दिवसांत रणबीरच्या ‘रामायण’ची १५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री! जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

Shraddha Kapoor Eetha Movie: पायात ८ किलोचे घुंगरू, अंगावर नऊवारी साडी; श्रद्धा कपूरने ‘ईठा’साठी घेतली प्रचंड मेहनत
4

Shraddha Kapoor Eetha Movie: पायात ८ किलोचे घुंगरू, अंगावर नऊवारी साडी; श्रद्धा कपूरने ‘ईठा’साठी घेतली प्रचंड मेहनत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.