
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘रामायण’ने प्रदर्शनाच्या १४ व्या दिवशी २३.२० कोटी रुपयांची कमाई केली. या दिवशी चित्रपटाचे २२,२८९ शो आयोजित करण्यात आले होते. भारतात चित्रपटाची आतापर्यंतची कमाई ८४४.४० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हिंदी भाषेत चित्रपटाने १६.५० कोटी रुपये, मल्याळममध्ये २.१५ कोटी रुपये, कन्नडमध्ये १.६५ कोटी रुपये आणि तमिळमध्ये १.३० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
जगभरातील कमाई १,५०० कोटींच्या पार
‘रामायण’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवरही मोठी कामगिरी केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १,५१९.०५ कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या १४ दिवसांत चित्रपटाने १,५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रेम मिळत आहे.
या चित्रपटात रणबीर कपूरसोबत साई पल्लवी, रवी दुबे आणि यश महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. याशिवाय लारा दत्ता, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंह, शीबा चड्ढा, सौरभ सचदेवा, विवेक ओबेरॉय आणि इंदिरा कृष्णन यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कलाकारांचा अभिनय, चित्रपटाची भव्य मांडणी आणि व्हीएफएक्स यामुळे ‘रामायण’ला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.