Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shweta Tiwari: श्वेता तिवारीला अपशब्द बोलणाऱ्याला मनसेचा दणका; ३ दिवसांत माफीपत्र, अभिनेत्रीने मानले राज ठाकरेंचे आभार

Shweta Tiwari: श्वेता तिवारीला ऑनलाइन शिवीगाळ करणाऱ्याला मनसेने शोधून काढलं. अवघ्या ३ दिवसांत संबंधित व्यक्तीने हाताने लिहिलेलं माफीपत्र पाठवलं. अभिनेत्रीने राज ठाकरे आणि मनसेचे आभार मानले.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 28, 2026 | 09:20 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Shweta Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या सोशल मीडियावर महिलांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाविरोधात आवाज उठवत आहे. काही दिवसांपूर्वी श्वेताने सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह कमेंट्स आणि मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. या मेसेजमध्ये तिच्याविषयी अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरण्यात आली होती. श्वेताने संबंधित व्यक्तींचे इन्स्टाग्राम अकाउंट्सही शेअर केले होते.

हे प्रकरण त्यावेळी अधिक चर्चेत आले, जेव्हा श्वेताने स्वतःला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थक म्हणवणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केला. मात्र, आता अभिनेत्रीने या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. श्वेताने स्पष्ट केले आहे की, तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींचा मनसेशी कोणताही संबंध नव्हता.

मनसेच्या पदाधिकाऱ्याने साधला श्वेताशी संपर्क

श्वेताने आपल्या नव्या पोस्टमध्ये सांगितले की, तिची तक्रार केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिली नाही. तिची पोस्ट पाहिल्यानंतर मनसेच्या सदस्या स्नेहल अडारकर यांनी श्वेताशी संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले.

श्वेताच्या म्हणण्यानुसार, स्नेहल यांनी स्पष्ट केले की, महिलांविरोधात अशा प्रकारची भाषा किंवा गैरवर्तन मनसेला अजिबात मान्य नाही. तसेच श्वेताला शिवीगाळ करणारे लोक मनसेचे सदस्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Rakshabandhan 2026: अर्जुन कपूरपासून सलमान खानपर्यंत; बहिणींची जबाबदारी पालकाप्रमाणे सांभाळतात हे कलाकार

तीन दिवसांत शोधून काढला संबंधित व्यक्तीला

श्वेताने स्नेहल अडारकर आणि मनसेच्या टीमचे आभार मानले. संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी श्वेताकडे काही दिवसांचा वेळ मागितला होता. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत श्वेताला त्या व्यक्तीचा फोन नंबर पाठवण्यात आला.

इतकंच नाही तर त्या व्यक्तीने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं माफीचं पत्रही श्वेताला पाठवण्यात आलं. या कारवाईबद्दल अभिनेत्रीने स्नेहल आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा; विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण

‘मला पुन्हा सांगावं लागलं नाही’

श्वेताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, या प्रकरणात कारवाई करण्यासाठी तिला पुन्हा पुन्हा पाठपुरावा करावा लागला नाही. संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यापासून ते तिच्याशी पुन्हा संपर्क साधण्यापर्यंत मनसेच्या टीमने स्वतःहून प्रयत्न केले.

महिलांचा अपमान करणाऱ्या वर्तनाला गांभीर्याने घेतल्याबद्दलही श्वेताने मनसेच्या टीमचे आभार मानले. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही समस्या उद्भवल्यास स्नेहल यांच्याशी संपर्क साधण्याचे आश्वासनही तिला देण्यात आले.

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

‘एक-दोन लोकांना पकडल्याने समस्या संपणार नाही’

दरम्यान, श्वेताने या संपूर्ण प्रकरणाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. एखाद्या व्यक्तीवर कारवाई केल्याने ऑनलाइन महिलांना शिवीगाळ करण्याची मोठी समस्या संपणार नाही, असे तिने म्हटले.

श्वेताच्या मते, सोशल मीडियावर स्वतःच्या स्क्रीनमागे लपून महिलांना अपशब्द बोलणारे हजारो किंवा लाखो लोक आहेत. समस्या केवळ एका व्यक्तीची किंवा एका घटनेची नसून, महिलांना ऑनलाइन अपमानित केल्यास कोणताही परिणाम भोगावा लागणार नाही, अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे.

श्वेताने यापूर्वी स्वतःला राज ठाकरे यांचा समर्थक म्हणवणाऱ्या काही व्यक्तींनी तिला पाठवलेल्या आक्षेपार्ह मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. त्यानंतर तिने राज ठाकरे यांनाही प्रश्न विचारला होता. मात्र, आता तिने स्पष्ट केले आहे की, तिच्याशी गैरवर्तन करणारे संबंधित लोक मनसेचे सदस्य नव्हते.

Web Title: Shweta tiwari online abuse mns raj thackeray apology letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • raj thackeray
  • Shweta Tiwari

संबंधित बातम्या

Rakshabandhan 2026: अर्जुन कपूरपासून सलमान खानपर्यंत; बहिणींची जबाबदारी पालकाप्रमाणे सांभाळतात हे कलाकार
1

Rakshabandhan 2026: अर्जुन कपूरपासून सलमान खानपर्यंत; बहिणींची जबाबदारी पालकाप्रमाणे सांभाळतात हे कलाकार

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र
2

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र

The Traitors 2: रिया चक्रवर्तीसह 5 स्पर्धक शो मधून बाहेर! श्वेता तिवारीच्या ‘मर्डर’नंतर बदलला गेम
3

The Traitors 2: रिया चक्रवर्तीसह 5 स्पर्धक शो मधून बाहेर! श्वेता तिवारीच्या ‘मर्डर’नंतर बदलला गेम

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत
4

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.