Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Revolutionaries: प्रेमाच्या सुरांनी सजलं ‘द रिव्होल्युशनरीज’; रोहित सराफ-प्रतिभा रांटाचं ‘माहिया’ गाणं रिलीज

The Revolutionaries: ‘द रिव्होल्युशनरीज’मधील ‘माहिया’ हे रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. रोहित सराफ आणि प्रतिभा रांटाची रोमँटिक केमिस्ट्री, नीती मोहन-तुषार जोशींचा आवाज आणि गाण्याची खासियत जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 06, 2026 | 09:15 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘द रिव्होल्युशनरीज’मधील ‘माहिया’ गाणं रिलीज
  • रोहित सराफ-प्रतिभा रांटाची रोमँटिक केमिस्ट्री
  • ११ सप्टेंबरला प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार सीरिज
The Revolutionaries:निखिल अडवाणी यांच्या आगामी ऐतिहासिक सीरिज ‘द रिव्होल्युशनरीज’ची सध्या जोरदार चर्चा आहे. स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असलेल्या या सीरिजमध्ये शौर्य, बंडखोरी आणि संघर्षासोबतच प्रेमाची हळुवार बाजूही पाहायला मिळणार आहे. याच प्रेमभावनेची झलक दाखवणारं ‘माहिया’ हे रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

टी-सीरीज प्रस्तुत या गाण्याला आकाशदीप सेनगुप्ता यांनी संगीत दिलं असून नीती मोहन आणि तुषार जोशी यांनी आपल्या सुरेल आवाजात ते गायलं आहे. गाण्याचे बोल तोलिया लवराज सिंग आणि गौरव चक्रवर्ती यांनी लिहिले आहेत. प्रेमात असण्याची भावना, आपुलकी आणि आपल्या खास व्यक्तीच्या सहवासातील छोट्या-छोट्या आनंदांचं सुंदर चित्रण या गाण्यातून करण्यात आलं आहे.

रोहित-प्रतिभाच्या प्रेमकथेची हळुवार झलक

‘माहिया’मध्ये सचिंद्र नाथ सन्याल ही भूमिका साकारणारा रोहित सराफ आणि प्रतिभा लाहिरीच्या भूमिकेतील प्रतिभा रांटा यांच्यातील बहरणारं प्रेम पाहायला मिळतं. चांदण्यांनी सजलेल्या रात्रीच्या पार्श्वभूमीवर दोघांची रोमँटिक केमिस्ट्री या गाण्यातून समोर येते.

गाण्यात दोघांमधील हलक्याफुलक्या खोड्या, जवळीक आणि प्रेमाचे क्षण टिपण्यात आले आहेत. नृत्यदिग्दर्शिका कृती महेश यांनी या रोमँटिक सीक्वेन्सचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

‘माहिया’बद्दल काय म्हणाली नीती मोहन?

गाण्याबद्दल बोलताना नीती मोहन यांनी ‘माहिया’च्या चाली आणि शब्दांमधून व्यक्त होणारी आपुलकी आपल्याला विशेष आवडल्याचं सांगितलं. प्रिय व्यक्तीला आपल्या भावनांच्या केंद्रस्थानी ठेवणारी या गाण्याची भावना त्यांना खूप भावली. तुषार जोशीसोबत हे गाणं गाण्याचा अनुभवही आनंददायी असल्याचं त्यांनी सांगितलं.

सत्य घटनांवर आधारित आहे ‘द रिव्होल्युशनरीज’

‘द रिव्होल्युशनरीज’ ही सीरिज भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तुलनेने कमी चर्चेत राहिलेल्या क्रांतिकारकांच्या कथा मांडते. ही सीरिज संजिव सान्याल यांच्या Revolutionaries: The Other Story of How India Won Its Freedom या पुस्तकावर आधारित आहे.

निखिल अडवाणी यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं असून मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी यांनी एम्मे एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तिची निर्मिती केली आहे. यात भुवन बाम, रोहित सराफ, प्रतिभा रांटा आणि गुरफतेह पीरजादा प्रमुख भूमिकेत आहेत. जेसन शाह, पाओली दाम आणि तोता रॉय चौधरी हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

‘द रिव्होल्युशनरीज’चा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्राइम व्हिडीओवर होणार आहे. दरम्यान, ‘माहिया’ हे गाणं आता संगीतप्रेमींच्या भेटीला आलं असून, या रोमँटिक ट्रॅकमधून रोहित आणि प्रतिभाची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!

Web Title: The revolutionaries mahiya song rohit saraf pratibha ranta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Song

संबंधित बातम्या

Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!
1

Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!

Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! मराठमोळ्या अंदाजात भन्नाट जलवा
2

Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! मराठमोळ्या अंदाजात भन्नाट जलवा

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत
3

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
4

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.