Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Traitors Season 2: आजपासून सुरू होणार ‘द ट्रेटर्स २’; कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या स्पर्धकांची संपूर्ण यादी

The Traitors Season 2: करण जोहर पुन्हा होस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द ट्रेटर्स २’चा प्रीमियर १३ ऑगस्टला या ओटीटीवर होणार असून जाणून घ्या स्पर्धकांची संपूर्ण यादी.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 13, 2026 | 12:40 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

The Traitors Season 2: प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘द ट्रेटर्स’ या रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन आज, गुरुवारपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीझनमध्ये अभिनेते, विनोदी कलाकार, उद्योजक, शेफ, संगीतकार, रिअॅलिटी स्टार्स आणि डिजिटल क्रिएटर्स अशा विविध क्षेत्रांतील स्पर्धकांचा सहभाग आहे. त्यामुळे यंदाचा सीझन आणखी मनोरंजक होण्याची शक्यता आहे.

‘द ट्रेटर्स २’ कधी आणि कुठे पाहता येणार?

‘द ट्रेटर्स सीझन २’चा प्रीमियर १३ ऑगस्ट रोजी होणार आहे. हा शो प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केला जाणार आहे. पहिल्या सीझनप्रमाणेच यंदाही करण जोहर शोचं सूत्रसंचालन करणार आहे. शोचे नवीन भाग दर गुरुवारी प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

कोण-कोणते स्पर्धक सहभागी?

‘द ट्रेटर्स २’मध्ये यंदा अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले आहेत. मल्लिका शेरावत, रिया चक्रवर्ती, मुनव्वर फारुकी, श्वेता तिवारी, क्रिस्टल डिसूझा, अभिषेक मल्हान, शालिनी पासी, पारुल गुलाटी, दलीप ताहिल, रणवीर ब्रार, शहनिल गिल, हरमन सिंघा, आदित्य कुलश्रेष्ठ, तनिष्ठा मेहरा, कर्ण चोप्रा आणि प्रिशा यांच्यासह अनेक स्पर्धक शोमध्ये दिसणार आहेत.

विविध क्षेत्रांतील या सेलिब्रिटींना एकाच घरात एकत्र आणून त्यांच्या रणनीती, मैत्री आणि विश्वासाची परीक्षा घेतली जाणार आहे.

कुठे झालं ‘द ट्रेटर्स २’चं शूटिंग?

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, पहिल्या सीझनप्रमाणेच ‘द ट्रेटर्स सीझन २’चं शूटिंग राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये करण्यात आलं आहे. आलिशान राजेशाही पार्श्वभूमीवर खेळला जाणारा हा खेळ शोला आणखी खास बनवणार आहे.

‘द ट्रेटर्स’मध्ये नेमकं काय होतं?

‘द ट्रेटर्स’मध्ये सहभागी स्पर्धकांची मुख्यतः दोन गटांमध्ये विभागणी केली जाते—‘ट्रेटर्स’ आणि ‘इनॉसंट्स’. ट्रेटर्सना आपली खरी ओळख इतर स्पर्धकांपासून लपवून ठेवायची असते आणि इनॉसंट्सना एकेक करून गेममधून बाहेर काढायचं असतं.

दुसरीकडे, इनॉसंट्सचं काम ट्रेटर्सना ओळखून त्यांना गेममधून बाहेर काढण्याचं असतं. यासाठी शोमध्ये विविध टास्क आणि रणनीतीचे टप्पे पाहायला मिळतात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोण आपली फसवणूक करतंय, याचा अंदाज लावणं स्पर्धकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

‘द ट्रेटर्स १’चे विजेते कोण?

‘द ट्रेटर्स’च्या पहिल्या सीझनमध्ये उर्फी जावेद आणि निकिता लुथरा यांनी बाजी मारली होती. आता दुसऱ्या सीझनमध्ये कोण विजेता ठरणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Aai Tuljabhavani: ‘इंद्रायणी’ फेम सांची भोयर साकारणार ‘लहान तुळजाई’; ‘आई तुळजाभवानी’मध्ये होणार मोठा दैवी खुलासा

मल्लिका शेरावतचा टॉम क्रूझबद्दल मोठा दावा

शोच्या प्रीमियरआधी प्रदर्शित झालेल्या प्रोमोजपैकी मल्लिका शेरावतचा एक प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मल्लिकाने टॉम क्रूझला तिच्यावर क्रश असल्याचा दावा केला आहे.

प्रोमोमध्ये मल्लिकाला तिचा कोणावर क्रश आहे का, असं विचारण्यात येतं. सुरुवातीला ती याला नकार देते. मात्र, त्यानंतर ती म्हणते की प्रत्येकाचा कोणावर ना कोणावर तरी क्रश असतो आणि सध्या टॉम क्रूझचा तिच्यावर क्रश असल्याचं ती सांगते.

टॉम क्रूझ तिला सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवत असल्याचाही दावा मल्लिकाने केला. हे व्हिडिओ कोणत्या प्रकारचे असतात, असं विचारल्यावर ती दोघे एकत्र पार्टी करत असल्याचं सांगते. तिच्या या दाव्यामुळे प्रोमोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

आता करण जोहरच्या सूत्रसंचालनाखाली ‘द ट्रेटर्स २’मध्ये कोण ट्रेटर ठरतं आणि कोण इनॉसंट राहून अंतिम विजय मिळवतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Kangana Ranaut: ‘Gen-Z’ला ‘Generation Gutter’ म्हणणं कंगना रणौतला पडलं महागात; FIR दाखल, कोर्टात सुनावणी होणार

Web Title: The traitors season 2 starts today when and where to watch contestants list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • karan johar
  • Munawar Faruqui

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.