
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
पुन्हा एकदा कलाकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसापूर्वीच अभिनेता टायगर श्रॉफ झालेल्या गोळीबारामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान आता ही नवीन माहीती समोर आली आहे.
मुंबईच्यो महापौर ऋतु तावडे यांना सुद्धा धमकीसंदर्भात इमेल मिळाल्याची माहिती मिळत आहे. याईमेलमध्ये अमिताभ बच्चन यांचे जुहू येथील ‘जलसा’ निवासस्थान आणि दिलजीत दोसांझ यांच्या आगामी कार्यक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे.
सध्या या धमकीमागील व्यक्ती कोण आहे आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे, याबाबत तपास यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे.दिलजीत दोसांझचा मुंबईतील रेसकोर्स इथे २७ नोव्हेंबर रोजी कॉन्सर्ड आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाला धमकी मिळाल्याने आयोजक आणि चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापौर कार्यालयाबरोबरच अनेक शाळांनाही धमकी देण्यात आली आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि दिलजित दोसांज यांच्या कंसर्टलाही उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.मुंबईतल्या प्रमुख शाळांनाही धमकीवजा ईमेल पाठवण्यात आला आहे.
दादरमधील ३ ते ४ प्रमुख शाळांना सकाळच्या सुमारास ही धमकी वजा ईमेल आल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. ईमेलबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी शाळांची झडची घेतली आहे. पण पोलिस तपासात संशयास्पद गोष्टी आढळून आल्या नाहीत.मात्र या धमकीवजा ईमेलमुळे शाळा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.