Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Tukaram Mundhe FDA Action: त्या जाहिरातीप्रकरणी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला महाराष्ट्र FDAची नोटीस. १५ दिवसांत प्रमोशनल कंटेंट हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 16, 2026 | 11:50 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Tukaram Mundhe FDA Action: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ‘विमल पान मसाला/वेलची’च्या जाहिरातींमध्ये कथितपणे काम केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) तिन्ही अभिनेत्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. तसेच सोशल मीडियावरील संबंधित प्रमोशनल कंटेंट १५ दिवसांच्या आत हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रविवारी जारी करण्यात आलेल्या या नोटिसांमध्ये सूचनांचे पालन न केल्यास अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ (FSS Act) अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. FDAने खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवरील कायदेशीर निर्बंध आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधातील तरतुदींचा हवाला दिला आहे.

तिन्ही कलाकारांना ‘ब्रँड एंडोर्सर्स’ म्हणून नोटीस

FDAने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘अभिनेता/ब्रँड एंडोर्सर्स’ म्हणून नोटीस बजावली आहे. ‘विमल’ ब्रँडच्या पान मसाला आणि वेलचीशी संबंधित जाहिरातींच्या प्रमोशनमध्ये त्यांच्या सहभागाबाबत या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

FDAच्या नोटिसीनुसार, सोशल मीडिया आणि संबंधित मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘विमल वेलची’शी संबंधित जाहिरातींचा प्रचार आणि प्रसार सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

Sohail Khan On Weight Loss: ५५ वर्षांच्या सोहेल खानचं वजन इतकं का घटलं? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा, म्हणाला…

FSS Actच्या कलम २४चा उल्लेख

महाराष्ट्र FDAने नोटिसांमध्ये अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६च्या कलम २४चा उल्लेख केला आहे. या कलमांतर्गत खाद्यपदार्थांशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

FDAने स्पष्ट केले आहे की, कायद्याच्या किंवा त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांच्या विरोधात जाणाऱ्या जाहिरातींवरही कारवाईची तरतूद आहे.

Box Office: इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत ५५.७५ कोटींची कमाई, ‘बटवारा १९४७’ला टाकलं मागे

१५ दिवसांत कारवाई करण्याचे निर्देश

FDAने संबंधित प्रमोशनल कंटेंट हटवण्यासोबतच या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही दिले आहेत. १५ दिवसांच्या मुदतीत सूचनांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा नोटिसांमध्ये देण्यात आला आहे.

पान मसाला आणि संबंधित उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये सेलिब्रिटींच्या सहभागाबाबत गेल्या काही काळात नियामक संस्थांकडून अधिक बारकाईने लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना बजावण्यात आलेल्या या नोटिसांकडे आता बॉलिवूडसह चाहत्यांचंही लक्ष लागलं आहे.

Web Title: Tukaram mundhe fda action shah rukh khan ajay devgn tiger shroff notice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Bollywood
  • shahrukh khan
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
1

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
2

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
3

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
4

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.