Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tumbbad 2: ‘तुम्बाड’च्या आठवणी पुन्हा ताज्या! रेकीदरम्यान सापडले ‘आटे की गुडिया’चे मूळ साचे

Tumbbad 2: ‘तुम्बाड 2’च्या लोकेशन रेकीदरम्यान सापडला पहिल्या भागाचा अनमोल वारसा; वर्षांनंतर ‘आटे की गुडिया’चे मूळ साचे अन् कुलूप उघडण्याचं साधन मिळालं

  • By अमृता यादव
Updated On: Aug 20, 2026 | 10:05 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Tumbbad 2:‘तुम्बाड’ या कल्ट चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक रंजक बातमी समोर आली आहे. ‘तुम्बाड 2’च्या लोकेशन रेकीदरम्यान टीमला पहिल्या भागाशी संबंधित काही मूळ वस्तू सापडल्या आहेत. वाड्याची रेकी करताना टीमच्या हाती ‘आटे की गुडिया’चे मूळ साचे आणि वाड्याचं कुलूप उघडण्यासाठी वापरण्यात आलेलं साधन लागलं. वर्षानुवर्षे याच ठिकाणी जतन करून ठेवलेल्या या वस्तू पाहून टीमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

‘आटे की गुडिया’चे मूळ साचे सापडले

‘तुम्बाड’च्या पहिल्या भागाच्या चित्रीकरणात वापरण्यात आलेले ‘आटे की गुडिया’चे साचे त्याच ठिकाणी वर्षानुवर्षे तसेच पडून होते. ‘तुम्बाड 2’साठी लोकेशन शोधताना टीमला अचानक हे साचे दिसले. त्यानंतर पहिल्या चित्रपटात वापरण्यात आलेलं मूळ कुलूप उघडण्याचं साधनही टीमच्या हाती लागलं.

या अनपेक्षित शोधामुळे ‘तुम्बाड 2’च्या टीमसाठी हा क्षण भावुक आणि नॉस्टॅल्जिक ठरला. पहिल्या चित्रपटाचं वैशिष्ट्यपूर्ण विश्व उभं करण्यासाठी केलेल्या मेहनतीच्या आठवणी या वस्तूंमुळे पुन्हा ताज्या झाल्या.

‘जणू लोकेशनने आठवणी जपून ठेवल्या होत्या’

एका क्रू मेंबरने या प्रसंगाची आठवण सांगताना म्हटलं की, टीम केवळ रेकीसाठी वाड्यात गेली होती आणि पहिल्या चित्रपटाशी संबंधित काही सापडेल, अशी त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. मात्र ‘आटे की गुडिया’चे साचे दिसताच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यानंतर मूळ कुलूप उघडण्याचं साधन सापडणं हा आणखी एक अविश्वसनीय अनुभव होता.

इतक्या वर्षांनंतरही या वस्तू त्याच ठिकाणी पाहणं टीमसाठी विशेष होतं. जणू काही त्या लोकेशनने ‘तुम्बाड’च्या निर्मितीशी संबंधित छोट्या-छोट्या आठवणी जपून ठेवल्या होत्या आणि टीम परत येण्याची वाट पाहत होत्या.

‘तुम्बाड 2’मध्ये आलिया भट्ट आणि नवाजुद्दीन सिद्दीकी

दरम्यान, ‘तुम्बाड’च्या दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सोहम शाह, आलिया भट्ट आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकार या नव्या अध्यायात एकत्र दिसणार आहेत. सोहम शाह यांनी जुलैमध्ये या कास्टिंगची घोषणा केली होती.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम्बाड’मध्ये सोहम शाह प्रमुख भूमिकेत होते. लोककथा, भय आणि रहस्य यांचं अनोखं मिश्रण असलेल्या या चित्रपटाने आपल्या दृश्यात्मक शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. 2024 मध्ये चित्रपटाचं थिएटरमध्ये पुनर्प्रदर्शन झाल्यानंतर त्याला पुन्हा मोठा प्रतिसाद मिळाला.

Govinda-Sunita Ahuja: घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम! सुनीता आहुजाने घेतला घटस्फोटाचा अर्ज मागे; मॅनेजरने केला खुलासा

3 डिसेंबर 2027 रोजी प्रदर्शित होणार ‘तुम्बाड 2’

‘तुम्बाड 2’ची निर्मिती Sohum Shah Films या बॅनरअंतर्गत सोहम शाह करत आहेत. निर्माते डॉ. जयंतीलाल गडा यांच्या नेतृत्वाखालील Pen Studiosसोबत त्यांनी या चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आदेश प्रसाद करत आहेत.

विशेष म्हणजे ‘तुम्बाड 2’ हा चित्रपट 3 डिसेंबर 2027 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पहिल्या भागाच्या आठवणी जपणाऱ्या या अनपेक्षित शोधामुळे सिक्वेलबद्दलची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Aishwarya Narkar New Car: ऐश्वर्या नारकरांनी खरेदी केली नवी कोरी गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क! अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

Web Title: Tumbbad 2 location reki first film original aate ki gudiya molds lock opener found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • aalia bhatt
  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

BGMI LITE : क्राफ्टन 2026 च्या अखेरपर्यंत BGMI LITE लाँच करणार. 25 ऑगस्टपासून अँड्रॉइड प्री-रजिस्ट्रेशन सुरू
1

BGMI LITE : क्राफ्टन 2026 च्या अखेरपर्यंत BGMI LITE लाँच करणार. 25 ऑगस्टपासून अँड्रॉइड प्री-रजिस्ट्रेशन सुरू

Lagna Ani Barach Kahi: ‘लग्न आणि बरंच काही’चा नवा अंदाज; सुनेत्रा पवारांच्या हस्ते पोस्टर अनावरण
2

Lagna Ani Barach Kahi: ‘लग्न आणि बरंच काही’चा नवा अंदाज; सुनेत्रा पवारांच्या हस्ते पोस्टर अनावरण

Mahakavya Shri Ramayan Katha Teaser: ‘कच्चा बदाम गर्ल’ बनली सीता; टीझरवर नेटकऱ्यांचा संताप; ‘ही’ मोठी चूक आली समोर
3

Mahakavya Shri Ramayan Katha Teaser: ‘कच्चा बदाम गर्ल’ बनली सीता; टीझरवर नेटकऱ्यांचा संताप; ‘ही’ मोठी चूक आली समोर

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!
4

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.