Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या बालपणीचे ‘संपत चंपत’ आता टीव्हीवर! ‘Warner Bros ‘ची मुलांसाठी सर्वात मोठी घोषणा; वाचा सविस्तर

कार्टून नेटवर्क वाहिनीवर 'कियान अँड किकी' (Kian & Kiki) हा २०२६ मधील सर्वात मोठा शो लॉन्च होत आहे. कोस्मोस माया आणि फेबल स्पिनर्स स्टुडिओच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली ही मालिका जादूगारांच्या एका कुटुंबावर आधारित आहे

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2026 | 10:12 PM
तुमच्या बालपणीचे ‘संपत चंपत’ आता टीव्हीवर! ‘Warner Bros ‘ची मुलांसाठी सर्वात मोठी घोषणा; वाचा सविस्तर
Follow Us
Follow Us:

मुंबई: वार्नर ब्रदर्स डिस्कवरी कंपनीने भारतीय बालप्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी आणली आहे. २०२६ च्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या अधिक मनोरंजक बनवण्यासाठी कंपनीने ‘समर फिएस्टा’ या त्यांच्या आजवरच्या सर्वात मोठ्या स्थानिक आशय उपक्रमाची घोषणा केली आहे. या अंतर्गत पोगो आणि कार्टून नेटवर्क  या दोन आघाडीच्या वाहिन्यांवर भारतातच तयार झालेले दोन नवीन ओरिजिनल शोज् प्रदर्शित केले जाणार आहेत. पोगो, कार्टून नेटवर्क आणि डिस्कव्हरी किड्स या तीन वाहिन्यांवर मिळून २०० हून अधिक नवीन एपिसोड्स मुलांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.

या नवीन उपक्रमाची घोषणा करताना दक्षिण आशिया, वार्नर ब्रदर्स डिस्कवरीचे फॅक्चुअल एंटरटेनमेंट, लाइफस्टाइल अँड किड्स हेड श्री. अभिषेक म्हणाले, “आम्ही फक्त शोज् तयार करत नाही, तर मुलांसाठी एक नवीन जग निर्माण करतो. पोगोवर ‘संपत चंपत’ आणि कार्टून नेटवर्कवर ‘कियान अँड किकी’ या नवीन शोज्च्या माध्यमातून आम्ही ओरिजिनल भारतीय आयपीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहोत. या उन्हाळ्यातील कार्यक्रम मुलांसाठी वर्षभराचा ट्रेलर असतील.”

पोगोवर अवतरणार कॉमिक्समधील ‘संपत चंपत’

या उन्हाळ्यात बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘संपत चंपत’ हा शो पोगोवर सुरू होत आहे. ‘लोटपोट कॉमिक्स’च्या प्रसिद्ध पानातून लहान मुलांची आवडती कॉमिक जोडी आता अ‍ॅनिमेटेड स्वरूपात पडद्यावर येणार आहे. दोन गमतीदार चोरांच्या खोड्या आणि छोट्या गावांमधील आपुलकीची भावना या शोमधून रंगीबेरंगी अ‍ॅनिमेटेड जगात जिवंत करण्यात आली आहे.

कार्टून नेटवर्कवर ‘कियान अँड किकी’ची जादू

कार्टून नेटवर्क वाहिनीवर ‘कियान अँड किकी’ (Kian & Kiki) हा २०२६ मधील सर्वात मोठा शो लॉन्च होत आहे. कोस्मोस माया आणि फेबल स्पिनर्स स्टुडिओच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली ही मालिका जादूगारांच्या एका कुटुंबावर आधारित आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा, जादू आणि कॉमेडीचे उत्तम मिश्रण यात पाहायला मिळेल. हे नवीन ओरिजिनल शोज् ‘डिस्कव्हरी+’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्ट्रीम केले जातील.

‘छोटा भीम’ आणि ‘लिटिल सिंघम’ एकत्र येणार!

या सुट्ट्यांमध्ये पहिल्यांदाच पोगो वाहिनीवरील मुलांचे दोन सर्वात लाडके हिरो— ‘छोटा भीम’ आणि ‘लिटिल सिंघम’ एकाच अ‍ॅनिमे-प्रेरित जगात एकत्र येऊन नवीन मोहिमा फत्ते करताना दिसणार आहेत. याशिवाय ‘ओमी नंबर १’ आणि ‘जय जगन्नाथ’ हे शोज् देखील सुरू राहतील. यंदा ‘छोटा भीम’चा १८ वा वाढदिवस साजरा केला जात असून, त्यानिमित्त विशेष टेलिफिल्म्स आणि ‘ओरिजिन ऑफ भीम बिग पिक्चर’चे खास शो दाखवले जातील.

कार्टून नेटवर्क आणि डिस्कव्हरी किड्सवर नॉनस्टॉप कॉमेडी

कार्टून नेटवर्कवर ‘सीएन बूम बॅम कॉमेडी जॅम’ अंतर्गत ‘टीन टायटन्स गो!’ आणि ‘बॅटव्हील्स’चे नवीन सीझन येणार आहेत. तसेच ‘बेबी लेमिंग्स’, ‘द विझी फॅमिली’ आणि ‘मॅका अँड रॉनी’ या आंतरराष्ट्रीय हिट मालिका मराठी व भारतीय भाषांमध्ये दर तीन महिन्यांनी नव्या रूपात सादर केल्या जातील. दुसरीकडे, डिस्कव्हरी किड्स वाहिनीवर ‘टिट्टो’ आणि ‘मिस्टर बीन’च्या नव्या भागांसह नॉनस्टॉप बदमाशी आणि धमाल सुरू राहणार आहे.

मॉल आणि ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये थेट गप्पा!

मुलांचे हे मनोरंजन फक्त टीव्ही स्क्रीनपुरते मर्यादित राहणार नाही. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, सूरत, हैदराबाद आणि विशाखापट्टणमसह देशातील १४ मोठ्या शहरांमधील २० हून अधिक मॉल्स आणि ‘बाउन्स’ या भारतातील सर्वात मोठ्या ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये ऑन-ग्राउंड अ‍ॅक्टिव्हिटीज आयोजित केल्या जाणार आहेत. तिथे मुलांना छोटा भीम, लिटिल सिंघम, टॉम अँड जेरी या त्यांच्या आवडत्या पात्रांच्या लाईव्ह मॅस्कॉट्सना  प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, छोटा भीमच्या डिजिटल वाढदिवसानिमित्त चाहत्यांना डिजिटल लाडू केकद्वारे भीमचा एक भव्य डिजिटल पुतळा बनवण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे विशेष आमंत्रणही दिले जाणार आहे.

Web Title: Warner bros discovery announcement 2026 summer fiesta sampat champat pogo cartoon network entertainment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Television Shows

संबंधित बातम्या

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
1

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक
2

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?
3

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?

Prajakta Mali News: वाढदिवशी मंदिरदर्शन अन् थेट भाताच्या शेतात! प्राजक्ता माळीने अशी केली यंदाची खास सुरुवात
4

Prajakta Mali News: वाढदिवशी मंदिरदर्शन अन् थेट भाताच्या शेतात! प्राजक्ता माळीने अशी केली यंदाची खास सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.