Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Divyanka Tripathi: T1-T2 चा सस्पेन्स अखेर संपला! दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहियाने जाहीर केली जुळ्यांची नावं

Divyanka Tripathi: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावं जाहीर केली आहेत. ७ नोव्हेंबर रोजी यूट्यूब व्लॉगमधून त्यांनी T1 आणि T2 ची खरी नावं सांगितली. पहिल्या मुलाचं नाव दैविक, तर दुसऱ्या मुलाचं नाव वैद्विक ठेवलं आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 08, 2026 | 01:45 PM
Divyanka Tripath: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Divyanka Tripath: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • त्रिपाठी आणि विवेक दहियाने जुळ्या मुलांची नावं जाहीर केली.
  • T1 आणि T2 ची नावं दैविक आणि वैद्विक ठेवली आहेत.
  • यूट्यूब व्लॉगमधून पाच महिन्यांनी नावांचा खुलासा केला.

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया यांच्या आयुष्यात लग्नाच्या दहा वर्षांनंतर, जून 2026 मध्ये जुळ्या मुलांचे आगमन झाले. तेव्हापासूनच सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता, या दोघांनी आपल्या मुलांची नावं काय ठेवलीत? आता अखेर या जोडप्याने आपल्या दोन मुलांची नावे जाहीर केली आहेत.मुलांच्या जन्मानंतर जवळपास पाच महिन्यांनी, 7 नोव्हेंबर रोजी दिव्यांका आणि विवेक यांनी त्यांची नावे त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. मुलांच्या जन्मापासून हे जोडपं आपल्या जुळ्या मुलांना ‘टी1’ आणि ‘टी2’ अशी हाक मारत होतं. आता टी1 आणि टी2 ची खरी नावं समोर आलीत. Divyanka Tripathi:

नक्की नावं काय ठेवलीत?

नुकतंच दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्लॉग टाकला. त्यात त्यांनी आपल्या कुटुंबातल्या लोकांसमोर एक गेम ठेवला होता. त्यात काही क्लू दिले होते, त्या आधारे त्यांच्या जुळ्या मुलांची नावे उघड करायची होती. खूप मजा आली त्या व्हिडिओमध्ये.

जेव्हा विवेकच्या वडिलांनी एक क्लू सोडवला, तेव्हा दिव्यांकाने यूट्यूबवरील आपल्या चाहत्यांसमोर मुलांची नावे जाहीर केली.आपल्या पहिल्या मुलाचं नाव सांगताना दिव्यांका म्हणाली, “तर, आता वेळ आली आहे T1 चं नाव सांगायची! T1 चं नाव ‘दैविक’ आहे.” त्यानंतर तिने सांगितलं की, त्यांच्या दुसऱ्या मुलाचं, म्हणजेच T2 चं नाव ‘वैद्विक’ ठेवलंय.ही नावं ऐकून चाहते एकदम खुश झालेत. कमेंटमध्ये सगळ्यांनी ‘खूप सुंदर नाव आहे’, ‘देव करो मुलं सुखी राहो’ असं लिहिलंय.

Usha Uthup Birthday: कधीकाळी आवाजाची उडवली जायची खिल्ली, आज त्याच आवाजाची जगभरात जादू; उषा उथुप यांची प्रेरणादायी कहाणी!

‘दैविक’ नाव का ठेवलं?

व्हिडिओमध्ये पुढे, दिव्यांकाने आपल्या जुळ्या मुलांची नावे निवडण्यामागचं कारण आणि त्यांचे अर्थ सांगितले. ‘दैविक’ या नावाविषयी बोलताना तिने सांगितलं की, तिचा पहिला मुलगा अगदी विवेकसारखाच आहे.दिव्यांकाने सांगितलं की, जन्मापासूनच ‘दैविक’ची पकड खूप घट्ट होती. तो तिची बोटं एकदम घट्ट पकडून ठेवायचा. अभिनेत्री म्हणाली, “सुरुवातीपासूनच त्याच्यामध्ये खूप ताकद होती.” दैविकचे चेहऱ्यावरील हावभाव आणि शारीरिक ठेवण काही प्रमाणात तिच्यासारखीच आहे. म्हणजे मुलगा आई-बाबा दोघांची पण कॉपी आहे.

‘वैद्विक’ नावाचा अर्थ काय?

दिव्यांका आणि विवेक यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव ‘वैद्विक’ ठेवलंय. दिव्यांकाने सांगितलं की, जन्माच्या वेळी वैद्विक त्याच्या भावाच्या तुलनेत थोडा कमकुवत होता. म्हणूनच त्याला हे खास नाव दिलंय.या नावाचा अर्थ सांगताना तिने सांगितलं की, ‘वैद’ म्हणजे ‘उपचार करणारा’ आणि ‘द्विक’ म्हणजे ‘दुप्पट’. त्यामुळे या नावाचा अर्थ असा व्यक्ती जो स्वतःला दुप्पट वेगाने बरे करण्याची क्षमता ठेवतो, असा होतो. किती विचार करून नाव ठेवलंय ना?

गरोदरपणाची बातमी कशी दिली होती?

26 मे रोजी दिव्यांका आणि विवेक यांनी एक पोस्ट शेअर करून गरोदरपणाची गोड बातमी दिली होती. त्यात तिने ती जुळ्या मुलांची आई होणार असल्याचं पण सांगितलं होतं. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, “आम्ही आनंदाची मागणी केली होती आणि देवाने म्हटलं, ‘दुप्पट आनंद घ्या!’ आम्हाला जुळ्या मुलांचे वरदान मिळाले आहे.”या खास प्रसंगी आपला आनंद व्यक्त करताना विवेकने लिहिलं होतं.

Sugi Parivar Diwali Pahat: दिवाळीही साजरी केली, शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदतही केली! सुगी परिवाराचा कौतुकास्पद निर्णय…

“माझे करण-अर्जुन आले आहेत!” ते वाचून चाहत्यांना पण खूप हसायला आलं होतं.सध्या काय करतायत दोघं?दिव्यांका आणि विवेक सध्या ‘पती पत्नी और पंगा’ या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून पण दिसतायत. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये ते त्यांच्या जुळ्या मुलांनासुद्धा तिथे घेऊन गेले होते. पण अजून त्यांनी आपल्या चिमुकल्यांचा चेहरा दाखवलेला नाही. चेहरा दाखवायला ते थोडी वाट बघतायत.एकंदरीत, लग्नाच्या 10 वर्षानंतर आलेले दैविक आणि वैद्विक हे दोघांच्याही आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहेत.

Web Title: Divyanka tripathi vivek dahiya twin baby names daivik vaidvik rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: मतदार यादीतून नाव वगळलं गेलंय? चंद्रपुरातील पात्र मतदारांना पुन्हा संधी; तातडीने करा ही प्रक्रिया
1

Chandrapur News: मतदार यादीतून नाव वगळलं गेलंय? चंद्रपुरातील पात्र मतदारांना पुन्हा संधी; तातडीने करा ही प्रक्रिया

Hindustan Coca-Cola IPO 2026: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! कोका-कोला आणणार मेगा IPO
2

Hindustan Coca-Cola IPO 2026: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! कोका-कोला आणणार मेगा IPO

Board Exam Topper Habits: दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्यात? पारंपरिक सल्ल्यांना फाटा देऊन ‘असा’ करा स्मार्ट स्टडी
3

Board Exam Topper Habits: दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्यात? पारंपरिक सल्ल्यांना फाटा देऊन ‘असा’ करा स्मार्ट स्टडी

Siddharth Chandekar and Mitali New House: सिद्धार्थ-मितालीच्या ‘द टेराकोटा हाऊस’ची पहिली झलक
4

Siddharth Chandekar and Mitali New House: सिद्धार्थ-मितालीच्या ‘द टेराकोटा हाऊस’ची पहिली झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.