Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netfix Weekend Plan: या विकेंडला काय पाहायचं? Netflix वरचे हे नवे चित्रपट आणि मालिका अजिबात मिस करू नका

Netfix Weekend Plan: सुट्टीच्या दिवशी घरबसल्या मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असेल, तर नेटफ्लिक्सने यावेळी प्रेक्षकांसाठी विविध प्रकारचे नवीन चित्रपट आणि वेब सिरीज उपलब्ध करून दिल्या आहेत. रोमँस, थ्रिलर, कॉमेडी, क्राईम, अॅक्शन आणि रिअॅलिटी शोसह प्रत्येक प्रेक्षकासाठी काहीतरी खास पाहायला मिळणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 25, 2026 | 06:42 PM
Netfix Weekend Plan (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Netfix Weekend Plan (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेटफ्लिक्सवर या विकेंडला विविध प्रकारचे नवीन चित्रपट, वेब सिरीज आणि रिअॅलिटी शो रिलीज 
  • रोमँस, थ्रिलर, कॉमेडी, क्राईम, अॅक्शनसह प्रत्येक मूडसाठी पाहण्यासारखा कंटेंट उपलब्ध 
  • भारतीय कंटेंटबरोबरच कोरियन, थाई आणि इतर आंतरराष्ट्रीय मालिकांचाही समावेश 
सुट्टीच्या दिवशी घरबसल्या एखादा दमदार चित्रपट किंवा वेब सिरीज पाहण्याचा प्लॅन असेल, तर नेटफ्लिक्सवर यावेळी भरपूर नवीन पर्याय उपलब्ध केले आहेत. रोमँस, थ्रिलर, कॉमेडी, क्राईम, अॅक्शन आणि रिअॅलिटी शो अशा प्रत्येक प्रकारच्या प्रेक्षकांसाठी काही ना काही खास रिलीज करण्यात आलंय. भारतीय कंटेंटसोबतच कोरियन, थाई आणि आंतरराष्ट्रीय मालिका देखील यादीत आहेत. जर तुम्ही आज काय पाहू? या प्रश्नात अडकला असाल, तर ही यादी तुमच्यासाठी उपयोगाची ठरू शकते. (Netfix Weekend Plan)

लॉक अप 2

सर्वप्रथम बोलायचं झालं तर ‘लॉक अप 2’ या रिअॅलिटी शोची जोरदार चर्चा सुरू आहे. शोमध्ये स्पर्धकांमधील वाद, टास्क, मैत्री आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्येक भागानंतर नवीन ट्विस्ट पाहायला मिळत असल्याने हा शो सोशल मीडियावरही ट्रेंड होत आहे. सूत्रसंचालनातही वेगळा अंदाज पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांचा उत्साह कायम आहे.

मुसाफिर कॅफे

प्रेमकथा आवडणाऱ्यांसाठी ‘मुसाफिर कॅफे’ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. दोन व्यक्तींच्या नात्यात काळानुसार होणारे बदल, वेगळं होणं आणि पुन्हा एकमेकांकडे परतण्याचा भावनिक प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. साधी पण मनाला भिडणारी कथा आणि कलाकारांचा सहज अभिनय हा चित्रपट खास बनवतो.

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?

कॉन सिटी

क्राईम आणि विनोद यांचं भन्नाट मिश्रण पाहायचं असेल, तर ‘कॉन सिटी’ नक्की पाहायला हरकत नाही. एका कुटुंबाभोवती फिरणारी ही कथा सुरुवातीला साधी वाटते, पण पुढे अनेक रहस्यांचा उलगडा होत जातो. अपहरण, जुने संबंध आणि अनपेक्षित वळणांमुळे चित्रपट शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवतो.

एलिट फोर्स

अॅक्शन आणि सस्पेन्स आवडणाऱ्यांसाठी ‘एलिट फोर्स’ ही वेब सिरीज उत्तम पर्याय आहे. एका विशेष पोलीस पथकाभोवती फिरणाऱ्या या कथेत धोकादायक मिशन, भावनिक नातेसंबंध आणि थरारक घटना पाहायला मिळतात. प्रत्येक भागानंतर पुढे काय होणार याची उत्सुकता वाढत जाते.

स्पूकी इन लव्ह

कोरियन ड्रामाचे चाहते असाल तर ‘स्पूकी इन लव्ह’ तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायलाच हवी. रोमँटिक कथा आणि अलौकिक घटनांचा सुंदर मेळ या मालिकेत पाहायला मिळतो. भुतांशी संबंधित रहस्ये, हलकाफुलका विनोद आणि हळूहळू फुलणारं प्रेम यामुळे ही मालिका वेगळी वाटते.

72 हॉर्स

हॉलिवूडमधील हलकाफुलका मनोरंजन शोधत असाल, तर ’72 हॉर्स’ हा अॅक्शन-कॉमेडी चित्रपट पाहू शकता. एका साध्या माणसाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या विचित्र घटनांमुळे सुरू होणारा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यात अॅक्शनचाही तडका असल्याने चित्रपट अधिक मनोरंजक बनतो.

द डेब्ट कलेक्टर

थाई सिनेमांची आवड असेल तर ‘द डेब्ट कलेक्टर’ नक्की पाहा. एका कर्जवसुली करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य, त्याचा भूतकाळ आणि संकटातून बाहेर पडण्याचा संघर्ष या चित्रपटात दाखवला आहे. अॅक्शनसोबत भावनिक बाजूही प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

“My Dear Cockroach….” म्हणत प्रकाश राज यांनी पोस्ट टाकत cjpचे केले अभिनंदन

या आठवड्यात नेटफ्लिक्सने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. थरार, प्रेम, विनोद किंवा रहस्य अशा कोणत्याही प्रकारचा कंटेंट तुम्हाला आवडत असेल, तरी तुमच्यासाठी काहीतरी नवीन नक्की आहे. त्यामुळे या वीकेंडला मोबाईल किंवा टीव्हीसमोर बसून मनोरंजनाचा भरपूर आनंद घेण्याची ही उत्तम संधी आहे.

Web Title: What to watch this weekend dont miss these new movies and series on netflix

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • Netflix
  • This week

संबंधित बातम्या

Taapsee Pannu: ‘गांधारी’ची ग्लोबल झेप; ४० हून अधिक देशांत ट्रेंडिंग, अभिनेत्री भावुक
1

Taapsee Pannu: ‘गांधारी’ची ग्लोबल झेप; ४० हून अधिक देशांत ट्रेंडिंग, अभिनेत्री भावुक

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!
2

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.