
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
ZEE5 New Look: भारतातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5ने आपल्या प्लॅटफॉर्मचा अनुभव नव्या रूपात सादर केला आहे. प्रेक्षकांना कंटेंट शोधताना अधिक सोपा आणि स्मार्ट अनुभव मिळावा, यासाठी प्लॅटफॉर्मवर स्मार्ट पर्सनलायझेशन, एआयच्या मदतीने कंटेंट शोधण्याची सुविधा आणि अधिक आकर्षक व्हिज्युअल नॅव्हिगेशनचा समावेश करण्यात आला आहे. मोबाइलपासून कनेक्टेड टीव्हीपर्यंत वेगवेगळ्या स्क्रीनवर सहज वापरता येईल, अशा पद्धतीने नव्या अनुभवाची रचना करण्यात आली आहे.
नव्या ZEE5वर कंटेंट पाच स्वतंत्र विभागांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रीमियम एंटरटेनमेंट, Free5, KidZ, TV आणि Sports अशा विभागांमुळे प्रेक्षकांना आपल्या आवडीचा कंटेंट अधिक सहजपणे शोधता येणार आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या कंटेंट पाहण्याच्या सवयी लक्षात घेऊन या नव्या अनुभवाची रचना करण्यात आली आहे.
नव्या प्लॅटफॉर्म अनुभवामध्ये पर्सनलायझेशनला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. प्रेक्षकांच्या आवडीनुसार योग्य कंटेंट सुचवण्यासोबतच एआयच्या मदतीने कंटेंट शोधण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या कंटेंटमधून आपल्या आवडीचं मनोरंजन शोधणं अधिक सोपं होणार आहे.
याशिवाय ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी पुढील पिढीतील एआयवर आधारित कस्टमर सपोर्ट असिस्टंटही उपलब्ध करून देण्यात आला आहे. सबस्क्रिप्शन, प्लेबॅक, ॲक्सेस, कंटेंट किंवा डिव्हाइसशी संबंधित अडचणींवर या सुविधेच्या माध्यमातून अधिक जलद मदत मिळणार आहे.
डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षेलाही प्लॅटफॉर्मवर महत्त्व देण्यात आलं आहे. वापरकर्त्यांच्या डेटाचं संरक्षण करण्यासाठी प्रगत सुरक्षा उपायांचा आधार घेण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
ZEE5ने आपल्या कंटेंट लायब्ररीमध्ये प्रीमियम इंग्लिश मनोरंजनाची स्वतंत्र श्रेणीही सादर केली आहे. यामध्ये जगभरातील चित्रपटांसोबत हॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांच्या चित्रपटांचा समावेश असेल.
पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्स आणि लायन्सगेट प्ले यांच्यासोबतच्या धोरणात्मक सहकार्याच्या माध्यमातून अनेक चित्रपटांचे डिजिटल प्रीमियर ZEE5वर होणार आहेत. ‘नॉर्मल’, ‘द इन्व्हाइट’, ‘ॲन्शस पीपल’, ‘बेबीज’, ‘द विझार्ड ऑफ द क्रेमलिन’, ‘हाऊ टू मेक अ किलिंग’, ‘टोनी’ आणि ‘पेपर टायगर’ यांसारख्या चित्रपटांचा या श्रेणीत समावेश आहे.
Free5ही नव्या रूपात
ZEE5च्या नव्या अनुभवातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे Free5. ही एव्हीओडी सेवा नव्या ओळखीसह प्रेक्षकांसमोर आली आहे. सीरिज, चित्रपट, कोरियन आणि चायनीज ड्रामा, ॲनिमे, बातम्या, मायक्रो ड्रामा आणि क्रिएटर्सचा कंटेंट एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे Free5वरील हा कंटेंट कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय मोफत पाहता येणार आहे. अधिक भाषा, विविध कंटेंट प्रकार आणि वेगवेगळ्या फॉरमॅटचा समावेश असल्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाचे मोठे पर्याय उपलब्ध होणार आहेत. यासोबतच जाहिरातदारांनाही विविध प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या नव्या संधी मिळणार आहेत.
संशोधनानंतर करण्यात आली प्लॅटफॉर्मची पुनर्रचना
नवा अनुभव तयार करण्यापूर्वी भारतीय प्रेक्षक कंटेंट कसा पाहतात आणि तो कसा शोधतात, याचा सखोल अभ्यास करण्यात आला. सध्याच्या ॲपबाबत मिळालेला अभिप्राय, विविध बाजारपेठांमधील ग्राहकांचा अभ्यास आणि फोकस ग्रुपमधील चर्चांच्या आधारे मोबाइल आणि कनेक्टेड टीव्हीवरील प्रेक्षकांचा संपूर्ण अनुभव समजून घेण्यात आला.
मोठ्या स्क्रीनवरील मनोरंजनाचा अनुभव कायम ठेवत ॲप अधिक सोपं आणि सहज वापरता यावं, यावर विशेष भर देण्यात आला. लॉन्चपूर्वी प्लॅटफॉर्मच्या विविध बाबींची तपासणी करण्यासाठी प्रॉडक्ट, इंजिनीअरिंग, क्वालिटी ॲश्युरन्स आणि डिझाइन टीमने एकत्रितपणे काम केलं.
ZEE5 इंडियाचे बिझनेस हेड आणि AI अँड इनोव्हेशनचे प्रमुख तेजकरण सिंग बजाज यांनी सांगितलं की, प्लॅटफॉर्मच्या पुढील टप्प्यात प्रेक्षकांना मनोरंजन अधिक सहजपणे शोधता यावं आणि त्यांच्या आवडीनुसार योग्य कंटेंट मिळावा, यावर भर देण्यात आला आहे. मोबाइल आणि कनेक्टेड टीव्हीवरील अनुभवाची नव्याने रचना करताना स्मार्ट पर्सनलायझेशन, एआय आणि सोप्या कंटेंट डिस्कव्हरीचा वापर वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, ZEE एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर प्रमोद प्रकाश यांनी सांगितलं की, केवळ स्वतंत्र फीचर्स वाढवण्याऐवजी संपूर्ण स्ट्रीमिंग अनुभवाचा नव्याने विचार करण्यात आला आहे. तंत्रज्ञानामुळे वापरातील अडथळे कमी व्हावेत आणि प्रेक्षकांचं लक्ष मनोरंजनावर केंद्रित राहावं, हा या नव्या रूपामागचा मुख्य विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.