रक्तातील कोलेस्ट्रॉल खेचून काढेल हा मसाला, आठवड्याभरातच दिसून येईल फरक
उच्च रक्तदाबाच्या समस्येवर मात करण्यासाठी दालचिनीचा मसाला फार फायदेशीर ठरतो. हा एक जुना मसाला आहे, जो फक्त चव आणि सुंगंधच नाही तर आरोग्यालाही अनेक फायदे मिळवून देतो. हा एक आयुर्वेदिक मसाला म्हणून ओळखला जातो. आयुर्वेदात दालचिनीचा वापर पचन सुधारण्यासाठी, खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवून देण्यासाठी केला जातो. याच्या मदतीने रक्तातील साखर देखील नियंत्रणात ठेवता येते . हे शरीरातील जळजळ कमी करते तसेच कोलेस्टेरॉल, विशेषतः गलिच्छ किंवा “लो डेन्सिटी लिपोप्रोटीन” कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. याचा वापर कोलेस्ट्रॉलच्या समस्या दूर कारण्यासाठी कसा करता येईल याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
दालचिनीचे प्रभावी फायदे
दालचिनी रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते. हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला कोलेस्ट्रॉलचा खराब थर कढून टाकण्यास मदत करते. यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळा कमी होतो आणि रक्त प्रवास सुधारते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. चांगले कोलेस्टेरॉल हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते आणि रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) काढून टाकण्यास मदत करते.
दालचिनीतील दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते. जळजळ रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दालचिनी हे नियंत्रित करून हृदयाचे आरोग्य सुधारते. याच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात राहते. रक्तातील साखरेच्या चढ-उतारामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो आणि दालचिनी आपले संतुलन राखते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्याने उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात 1 ते 2 ग्रॅम दालचिनी पावडर टाकून चांगले मिसळा. आता त्यात काळे मीठ आणि लिंबू किंवा मध मिसळून प्या. काही दिवस नियमित दालचिनीच्या पाण्याने सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे होतील.
वॉटर थेरपी करून मलायका अरोरा वयाच्या 51व्या वर्षीही दिसते तरुण, काय आहे ही पद्धत? जाणून घ्या
पाण्यात मिसळा
एक गल्स पाण्यात 1/2 चमचे दालचिनीची पावडर टाका आणि मिक्स करा आणि प्या
चहामध्ये मिसळा
चहामध्ये दालचिनी मिसळा. हे केवळ चवच नाही वाढवत तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे
फळे किंवा ओटमीलमध्ये मिसळा
तुम्ही फ्रुट सॅलड अथवा ओटमीलमध्ये मिसळून याचे सेवन करू शकता