चिकन-मटण-मासे कशात आहे सर्वाधिक प्रोटीन? काय खाऊन जगता येईल 100 वर्ष? योग्य पर्याय जाणून घ्या
सदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारात प्रथिनांचे असणे फार गरजेचे असते. आरोग्यासाठी प्रथिनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रथिनेयुक्त पदार्थ शरीराला ऊर्जा मिळवून देतात आणि स्नायूंना मजबूत करण्यास मदत करतात. मुख्यतः चिकन, मटण, मासे या पदार्थांना प्रथिनांचा मुख्य स्त्रोत मानला जातो. मात्र यापैकी कोणता पर्याय सार्वधिक चांगला आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या तिन्ही प्रथिनेयुक्त पदार्थांमध्ये वेगवगेळी पोषणतत्वे आढळली जातात, ज्याचे परिणाम देखील आरोग्यावर वेगवेगळे होत असतात. आज आपण या लेखात चिकन, मटण आणि मासे यांच्यातून मिळणाऱ्या फायद्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. हे फायदे तुम्हाला तिन्हीपैकी कोणता पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे हे शोधण्यास मदत करेल.
चिकन
चिकन हा चरबीयुक्त प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा साठा आढळला जातो. यात आढळून येणारे उच्च प्रमाणातील प्रथिने स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करतात. चिकनमध्ये व्हिटॅमिन बी6 आढळते जे शरीरातील ऊर्जा पातळी वाढवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच हे पचायला हलके असल्याकारणाने व्यायामानंतर चिकन खाल्ल्यास स्नायू पुनरुत्पादनाला मदत होते, ज्यामुळे स्टॅमिना वाढतो.
50 वर्षात एकदाही आजारी पडले नाहीत, आजही केस काळे; या 3 भाज्या खाऊन रामदेव बाबा ठेवतात शेकडो आजारांना दूर
मटण
मटण हा एक असा पदार्थ आहे ज्यात प्रथिने तर आढळतातच त्याच बरोबर यात लोह आणि झिंकचेही उत्तम प्रमाण आढळून येते. लोह शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते ज्यामुळे थकवा कमी येतो आणि शरीरातील ऊर्जा पातळी सुधारण्यास मदत होते. झिंक शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्याचे कार्य करते, ज्यामुळे तुम्ही अधिक ऍक्टिव्ह आणि तंदुरुस्त राहू शकता. पण लक्षात ठेवा, मटणात चरबीचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आहारात याचा अतिरेक टाळावा.
मासे
मासे हे सैल्मन आणि ट्यूना, हे ओमेगा-3 फॅटी ऍसिड्सचा समृद्ध स्रोत आहेत. यात आढळून येणाऱ्या या घटकांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि शरीरातील ऊर्जा पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाणही उत्तम असते जे स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. मासे पचायला हलके असतात. हे शरीराला तात्काळ ऊर्जा प्रदान करतात.
एकदा Insulin घेतल्यास आठवडाभर साखर नियंत्रणात राहील? आरोग्यासाठी औषध चांगले की इन्सुलिन? जाणून घ्या
कोणता पर्याय आहे उत्तम?
चिकन, मटण आणि मासे हे तीनही पदार्थांमध्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत आढळून येतो. मात्र आपल्या गरजेनुसार याची निवड करणे महत्त्वाचे ठरेल. स्टॅमिना वाढवण्यासाठी हलकं पचणारं आणि प्रथिनयुक्त पदार्थ आवश्यक असल्यामुळे चिकन आणि मासे हे उत्तम पर्याय ठरतात. तसेच जर तुमच्या शरीरात लोह आणि झिंकची कमतरता जेवणात असेल तर तुमच्यासाठी मटणाचा पर्याय सर्वोत्तम ठरेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.