फोटो सौजन्य - Social Media
सध्याच्या जीवनशैलीत अनेक घटकांमुळे फॅटी लिव्हरसारखा त्रास उद्भवतो. जगभरात अनेक अशा समस्या समोर येत आहेत, ज्या अतिशय गंभीर आहेत. मुळात, या आजरापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी अगोदर पॉकेटबंद ज्यूस तसेच कोल्डड्रिंक्स पासून चार हात लांब राहावे लागेल.या पेयांमध्ये उच्च प्रमाणात साखर आणि कृत्रिम पदार्थ असतात, जे शरीरासाठी हानिकारक असतात.
कोल्ड ड्रिंक्समध्ये उच्च प्रमाणात साखर असते, ज्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. जास्त साखरेचे सेवन केल्यास लिव्हरमध्ये चरबी साठण्याची प्रक्रिया वाढते. यामुळे लिव्हरची कार्यक्षमता कमी होते आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. पॉकेटबंद ज्यूसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात साखर आणि प्रिजर्व्हेटिव्ह असतात. या ज्यूसमधील साखर थेट लिव्हरमध्ये साठते आणि कार्य बिघडवते. तसेच, या ज्यूसमध्ये असलेल्या प्रिजर्व्हेटिव्हमुळे शरीरात विषारी पदार्थ साठण्याची शक्यता असते.
फॅटी लिव्हर आजारामुळे लिव्हरची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ शुद्ध होण्याची प्रक्रिया धीमी होते. यामुळे थकवा, अशक्तपणा, आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. दीर्घकाळ फॅटी लिव्हर आजाराच्या स्थितीत राहिल्यास हेपॅटायटीस, सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा धोका वाढतो.
जर फॅटी लिव्हर या विकारापासून दूर राहायचे असेल तर कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेटबंद पेयांचे सेवन टाळा. याऐवजी ताजे फळांचे रस, पाणी, नारळ पाणी, लिंबू पाणी यांसारखे नैसर्गिक पेय सेवन करणे फायद्याचे ठरते. तसेच, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे लिव्हरचे आरोग्य सुधारते. फॅटी लिव्हर आजार टाळण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स आणि पॉकेटबंद ज्यूसचा कमी वापर करणे, तसेच निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करणे आवश्यक आहे. यामुळे लिव्हरचे आरोग्य चांगले राहते आणि अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो.