थंडीत अंघोळ करताना अजिबात करू नका ही चूक, बाथरूममध्येच हार्ट अटॅक घेईल जीव, ब्रेन डेडचा वाढता धोका
बदलत्या ऋतूनुसारच हवामानातील बदल जाणवू लागतात. सध्या हिवाळा ऋतू नुकताच सुरु झाला आहे. थंडीचे आरोग्यावर सकारात्मक तसेच नकारात्मक असे दोन्ही परिणाम होत असतात. सततच्या थंड वातावरणामुळे शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. अनेकजण या ऋतूत शक्यतो गरम पाण्याने आंघोळ करतात मात्र काही चुकीच्या सवयी आणि गोष्टींमुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. आज आम्ही तुम्हाला या लेखात, हिवाळ्यात आंघोळ करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात तसेच आंघोळीची योग्य पद्धत कोणती, याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
अत्यंत थंड पाण्याचा वापर टाळा
हिवाळ्याच्या थंडीत अत्यंत थंड पाण्याने आंघोळ करणं शरीरावर ताण निर्माण करू शकते. थंड पाण्याचा वापर केल्याने शरीराच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर जास्तीचा ताण पडतो. यामुळे हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे या ऋतूत शक्यतो, कोमट किंवा गरम पाण्याने आंघोळ करावी.
उपाशीपोटी आंघोळ कधीही करू नये
हिवाळ्यात उपाशीपोटी आंघोळ करण शरीरासाठी घातक ठरू शकते. शरीरात साखरेचं प्रमाण कमी असल्याने अचानक अशक्तपणा अथवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. त्यामुळेच आंघोळ करण्यापूर्वी हलका नाश्ता करणं गरजेचं आहे, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळत राहील आणि शरीरावरील ताणही कमी होईल.
आंघोळ करताना ही चूक टाळा
या थंडीच्या दिवसात हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज सारख्या आजारांचा धोका वाढत असतो. आपल्या शरीराचे तापमान अचानक कमी होणे हे यामागचे कारण असू शकते. आपण गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर अचानक बाहेर पंख्याखाली येतो, ज्यामुळे शरीराचे तापमान अचानक बदलते. अचानक शरीराच्या तापमानात झालेले हे बदल रक्तवाहिन्या आकसवू शकतात. यामुळे ब्लड प्रेशर वाढतो, ज्यामुळे क्षा जास्त वाढते. अंघोळ करून लगेचच बाहेर आल्याने शरीराचं तापमान झपकन खाली येतं ज्यामुळे रक्तवाहिन्या आकसू लागतात. यामुळे ब्लड प्रेशर वाढून हार्टला रक्त पंप होत नाही आणि परिणामी हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो.
थंडीत आंघोळ करताना कोणती काळीजी घ्यावी?
डॉक्तरांच्या म्हणण्यानुसार, थंडीत गरमा गरम पाण्याने आंघोळ केल्याने हार्ट अटॅकचा धोका टाळता येऊ शकतो. हार्ट अटॅक किंवा ब्रेन हॅमरेजचा धोका टाळण्यासाठी आंघोळ केल्यांनतर त्वरित बाहेर येऊ नका तर त्याआधी अंग नीट टॉवेलने पुसा आणि संपूर्ण अंग झाकून किंवा कपडे घालूनच बाथरूमच्या बाहेर पडा. असे केल्याने थंडीचा वारा शरीराला थेट स्पर्श करणार नाही.
गुडघ्यापर्यंत वाढतील केसं, मूठभर तांदळापासून घरीच तयार करा Natural shampoo, जाणून घ्या योग्य पद्धत
आंघोळीसाठी खूप वेळ घेऊ नये
हिवाळ्यात आंघोळ करताना शक्यतो फारसा वेळ घेऊ नये. असे करणे शरीराच्या तापमानावर वाईट परिणाम करू शकते. दीर्घकाळ पाण्यात राहिल्याने शरीर गारठू शकते, ज्यामुळे रक्ताभिसरणाची गती कमी होते. यामुळे या ऋतूत कमी वेळेत आपली आंघोळ आटोपून घ्यावी.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.