सकाळी उठल्यावर दिसणारी ही लक्षण देत असतात डायबिटीज झाल्याचा इशारा, दुर्लक्ष केल्यास मृत्यूला पडू शकता बळी
डायबिटीज हा एक असा आजार आहे जो आपल्यासाठी फार घातक ठरू शकतो. मात्र आजकालच्या त्रस्त आणि धावपळीच्या वातावरणात हा आजार एक सामान्य समस्या बनली आहे. या आजाराचे दुष्परिणाम फार गंभीर ठरू शकतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहिली नाही, तर शरीरातील इतर अवयवांवर वाईट परिणाम होतो. साधारणपणे डायबिटीज या आजराची प्राथमिक लक्षणे सहज दिसून येत नाहीत. ज्यामुळे अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? सकाळी उठल्यावर आपल्या शरीरात दिसणारी काही लक्षण आपल्या डायबिटीज झाल्याचा इशारा देत असतात.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला फार महागात पडू शकते. चला तर मग सकाळी उठल्यावर अशी कोणती लक्षणे आहेत, जी आपल्या डायबिटीज झाल्याचा इशारा देत असतात ते जाणून घेऊयात. लक्षात ठेवा या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
हेदेखील वाचा – World Stroke Day 2024: सतत टेन्शनमध्ये असता? वेळीच सावध व्हा, ब्रेन स्ट्रोकची कारणे आणि निदान जाणून घ्या
सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे
डायबिटीज झाल्याचा संख्येत देणारं पाहिलं महत्त्वाचं लक्षण आहे आवश्यक थकवा येणे. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी असंतुलित असल्याने शरीराला ऊर्जा मिळत नाही. ज्यामुळे रात्री पुरेशी झोप घेऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवू लागतो. शरीरातील पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नसल्याने हा थकवा वाढत जातो.
तोंड कोरडे पडणे आणि तहान लागणे
डायबिटीज हा एक असा आजार आहे ज्यामुळे आपल्या शरीराला पुरेसे हायड्रेशन मिळत नाही. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते. यामुळे सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडतं आणि जास्त तहान लागू लागते. सतत पाणी पिऊनही तहान भागत नसेल तर लक्षात ठेवा, हे डायबिटीजचे लक्षण असू शकते.
हात-पाय सुजणे
डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये रक्ताभिसरणाची समस्या होऊ शकते, हात-पाय सुजू लागतात. यामुळे शरीराच्या इतर भागांमध्येही सूज येऊ लागते. रक्तातील साखर वाढल्यामुळे रक्तप्रवाह अडथळित होतो आणि यामुळे हात, पाय सुजून जातात. विशेषतः ही समस्या सकाळी अधिक जाणवू लागते.
हेदेखील वाचा – हे’ आहेत तुमच्या शरीरातील 4 हार्मोन्स जे तुम्हाला आनंदी ठेवतात; जाणून घेणे खूप गरजेचे
सतत लघवी होणे
रात्री सतत लघवीला जाणे आणि सकाळी उठल्यावर अधिक लघवी होणे हे डायबिटीजचे लक्षण आहे. याचे मूळ कारण म्हणजे शरीरातील साखर प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे किडनी जास्त प्रमाणात मूत्र तयार करते. त्यामुळे शरीरातील जास्त साखर लघवीद्वारे बाहेर पडते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. वारंवार लघवी लागणे आणि पाण्याची पातळी कमी होणे ही डायबिटीजची लक्षणे आहेत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.