Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ फळं नसांमध्ये जमा होणारं वाईट कोलेस्टेरॉल झपाट्यानं कमी करतात, आहारात करा समावेश

लिंबू, संत्री आणि द्राक्ष यांसारखी लिंबूवर्गीय फळे देखील तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये हेस्पेरिडिन असते, जे उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 28, 2023 | 03:50 PM
cholesterol level

cholesterol level

Follow Us
Follow Us:

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे (Lifestyle) आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे लोकांना कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ रक्तात असतो. साधारणपणे आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात. ज्याला चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) म्हणतात. चांगले कोलेस्टेरॉल रक्तात जमा होणारी चरबी (Fat) कमी करण्यास मदत करते आणि आपल्या धमन्या स्वच्छ ठेवते ज्यामुळे हृदयाकडे रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे होऊ शकतो. त्याच वेळी, खराब कोलेस्ट्रॉल खूप धोकादायक मानले जाते. जेव्हा त्याची पातळी वाढते, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये गोठण्यास सुरवात होते, ज्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्त प्रवाह लक्षणीय प्रमाणात कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचा धोका लक्षणीय वाढतो.

[read_also content=”आता अल्लाच्या भरवश्यावर कंगाल पाकिस्तान, अर्थमंत्री इशार डार यांनी केले हात वर, म्हणाले.. https://www.navarashtra.com/world/pakistan-finance-minister-says-about-pakistan-financial-crisis-nrps-365104.html”]

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खाण्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते जसे जंक फूड, तळलेले अन्न इ. दुसरीकडे, फायबरयुक्त फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करून वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी केली जाऊ शकते. काही फळांमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यापासून रोखता येते.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात समावेश करा

अॅव्होकॅडो- रक्तदाबाच्या रुग्णांनी अॅव्होकॅडोचे सेवन अवश्य करावे. एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन के, सी, बी5, बी6, ई आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते. एवोकॅडो शरीरातील चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रित करते.

टोमॅटो- टोमॅटोमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, के आणि सी आढळतात जे त्वचा, डोळे आणि हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय यामध्ये पोटॅशियमही भरपूर प्रमाणात आढळते. हे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि पक्षाघाताचा धोका कमी करते.

सफरचंद- डॉक्टर रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. कारण ते खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर आढळते जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यासोबतच हे हृदयाच्या स्नायू आणि रक्त पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते. 

 

लिंबूवर्गीय फळे-

लिंबू, संत्री आणि द्राक्ष यांसारखी लिंबूवर्गीय फळे देखील तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये हेस्पेरिडिन असते, जे उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. याशिवाय लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने महिलांमध्ये पक्षाघाताचा धोकाही लक्षणीयरीत्या कमी होतो.

 

पपई-

पपईमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच ते खराब कोलेस्ट्रॉलही कमी करते. मोठ्या पपईमध्ये 13 ते 14 ग्रॅम फायबर असते. रोज पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

Web Title: Fruits which help to remove bad cholesterol from body nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2023 | 03:42 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • healthy

संबंधित बातम्या

Bad Cholesterol: हेल्दी लाइफस्टाइल असूनही वाढतंय खराब कोलेस्ट्रॉल? जाणून घ्या खरी कारणं
1

Bad Cholesterol: हेल्दी लाइफस्टाइल असूनही वाढतंय खराब कोलेस्ट्रॉल? जाणून घ्या खरी कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.