Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खराब कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे जीवन येईल धोक्यात, हृदयाच्या आरोग्याचे होईल गंभीर नुकसान

रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे आहारात अतितिखट आणि तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य बिघडते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 04, 2026 | 02:04 PM
खराब कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या 'या' पदार्थांमुळे जीवन येईल धोक्यात

खराब कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या 'या' पदार्थांमुळे जीवन येईल धोक्यात

Follow Us
Close
Follow Us:

कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढते?
कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून काय खावे?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, वारंवार उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या आणि जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे कायमच आहारात सहज पचन आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. हल्ली कोणत्याही वयात हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन आरोग्य बिघडते. केवळ लठ्ठपणामुळे नाहीतर आहारात होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

छातीत साचून राहिलेला कफ होईल मोकळा! नियमित चघळून खा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, कायमचा मिळेल आराम

खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर सुरुवातीला अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने शरीरात गंभीर लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या याच लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यामुळे शरीराला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तात वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून आरोग्य बिघडते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हृदयविकाराच्या झटक्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे.

ट्रान्स फॅट्स:

आपल्यातील अनेकांना सकाळच्या नाश्त्यात सतत काहींना काही तेलकट तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. समोसे, कचोरी, फ्रेंच फ्राइज, पॅकेटमधले चिप्स किंवा इतर तिखट पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. ट्रान्स फॅट्स शरीरासाठी विषासमान मानले जातात. या पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी जमा होण्यास सुरुवात होते. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कायमच चांगल्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.

प्रोसेस्ड मीट आणि रेड मीट:

आपल्यातील अनेकांना चिकन, मटण खायला खूप जास्त आवडते. पण आवडीने खाल्लेले जाणारे शाहाकारी पदार्थ शरीरासाठी काहीवेळा अतिशय घातक ठरतात. या पदार्थांमध्ये असलेले घटक शरीरासाठी विष आहेत. कारण लाल मांस खाल्ल्यामुळे शरीराला धोका निर्माण होतो. यामध्ये असलेल्या सॅच्युरेटेड फॅटसमुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते. त्यामुळे रोजच्या आहारात प्रोसेस्ड मीट सॉसेज, सलामी, हॉटडॉग्स इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.

आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वारंवार दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?

रोजच्या आहारात ताजी फळे, पालेभाज्या आणि दूध, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. ओट्स, हिरव्या भाज्या, फळं आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी पदार्थांमध्ये चांगले फॅट्स असतात. हे पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. आहारात कायमच डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीर स्वच्छ राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?

    Ans: कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तातील एक मेणासारखा, चरबीसारखा पदार्थ आहे, जो शरीरातील पेशी आणि हार्मोन्ससाठी आवश्यक असतो.

  • Que: उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय आहेत?

    Ans: उच्च कोलेस्ट्रॉलची सहसा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, म्हणून याला 'सायलेंट किलर' म्हणतात.

  • Que: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: फळे, भाज्या, ओट्स, कडधान्ये, मासे, नट्स, बिया यांचा आहारात समावेश करा.

Web Title: These foods that increase bad cholesterol can endanger your life and cause serious damage to your heart health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • cholesterol symptoms

संबंधित बातम्या

खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत? मग नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, हृद्य राहील हेल्दी
1

खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत? मग नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, हृद्य राहील हेल्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.