रोजच्या धावपळीच्या आयुष्यात तणाव, चिंता याने अनेकांना ग्रासलेलं आहे. असं म्हणतात की शरीर आणि मन यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे मानसिक ताण तणावाचा तुमच्या शरीरावर देखील तितकाच गंभीर परिणाम होतो असं तज्ज्ञांकडून वारंवार सांगितलं जातं. तणाव हा मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यावरही तितकाच दुष्परिणाम करत आहे. ताण तणावाचा सर्वात गंभीर परिणाम हा वृद्ध व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
अतिरिक्त तणावाचा परिणाम हृदयावर होत असतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण हा एक चिंतेचा विषय ठरला असून वेळीच उपचार यावर करण्याची आवश्यकता आहे. अशा समस्या टाळण्यासाठी काय करता येईल याविषयी माहिती व काही टिप्स या लेखाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
हृदयविकाराच्या आजारापासून स्वत:ला कसं दूर ठेवायचं याबाबत डॉ. अहमद खान, इंटरनल मेडिसिन, मधुमेह आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई यांनी सांगितलं आहे. हल्ली तरुणांना शिक्षण, नोकरी, सोशल मीडिया, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक अपेक्षांच्या ओझामुळे उच्च पातळीच्या तणावाचा सामना करावा लागतोय. २० ते ३० वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, रक्तातील साखरेची उच्च पातळी, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांचे निदान होत आहे.
तणाव हा एक स्लो पॉईजन स्लो पॉईजनसारखा असून आरोग्याला घातक असतो. जरी त्याची लक्षणे लगेच दिसून येत नसली तरी, त्यामुळे एखाद्याला जीवघेण्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो. तणावामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढवते याचा परिणाम म्हणजे रक्तदाब आणि साखरेची पातळी वाढते. तसंच पचनसंस्थेवर याचा वाईट परिणाम होत असून पोटाभोवती चरबी साठवण्यास सुरुवात होते. ज्यामुळे लठ्ठपणा देखील होतो. ताण तणावाकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं जातं. मात्र यामुळे मधुमेह आणि हृदयविकार होण्याचं प्रमाण जास्त आहे.
निरोगी ऱ्हदयासाठी तरुणांनी खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा
कामातच्या व्यापामुळे तरुणांचं झोपेचं गणित कोलमडलेलं दिसून येतं. अपुरी झोप ही तरुण वर्गाची सर्वात मोठी समस्या होत आहे. याचा परिणाम तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे अनेक आजार बळावतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी झोपेचं चक्र सुधारणं गरजेचं आहे. दररोज सात ते आठ तासांची पुरेशी झोप आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
नियमित व्यायाम करा :
नियमित व्यायाम केल्यास मेंदूला नकारात्मक विचारांपासून सुटका मिळते. तसंच नियमित व्यायामामुळे शरीराला डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
संतुलित आहाराचे सेवन करा :
बाहेरील तेलकट पदार्थ तसंचं फास्टफूडचा परिणाम शरीरावर होतो. या जंकफूडमध्ये रासायनिक प्रक्रिया केली असल्या कारणाने शरीराला योग्य असलेली पोषक घटकं मिळत नाहीत.