गुडघेदुखी आणि सांधेदुखी
वयाच्या चाळिशीनंतर साधारण प्रत्येकालाच थोडयाफार प्रमाणात गुडघेदुखी जाणवते. जिन्याची चढ-उतार करणं, मांडी घालून किंवा उकिडवं बसता येणं, चालताना, पळताना होणाऱ्या हालचाली करणं या सर्व शारीरिक हालचाली अवघड होत आहेत याची जाणीव दिवसेंदिवस वाढते आणि रोजचे कामकाज करणंही अवघड होतंय हे लक्षात येतं.
मग मित्रमंडळीत किंवा कुटुंबात चर्चा करताना सर्वांनाच या वयात हा त्रास जाणवतो हे समजतं. आपण हळूहळू म्हातारे होत आहोत याची जाणीव होते.
घरगुती उपचार
विश्रांती घेणे आणि वेदना तीव्र करणारी कामं टाळणे, विशेषतः वजन पेलावी लागणारी कामं. बर्फाचा वापर करणे. प्रथम, तो दर तासाला 15 मिनिटापर्यंत लावावा. पहिल्या दिवसानंतर, दिवसातून किमान चारवेळा बर्फ लावावा.
या उपचारात गुडघे गरम पाण्याने शेकणं, कुठलंतरी मलम लावणं किंवा तेलाने मालिश करणं असे उपाय सुचवले जातात. उपायांचा परिणामही थोडाफार जाणवतो मग ऍलोपॅथी, होमिओपॅथी किंवा आयुर्वेद अशा डॉक्टरांच्या दवाखान्याच्या चकरा सुरू होतात. त्यांनी दिलेली औषधं, गोळया, मलमं, इंजेक्शनं इत्यादी उपचार चालू होतात. त्यामुळे गुडघेदुखी बऱ्यापैकी कमी झाल्याचं लक्षात येतं.
त्यानंतर अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टरांना प्रकृती दाखवल्यावर, तेही काही दिवस नवीन औषधोपचार, फिजिओथेरपी करण्याचा सल्ला देतात आणि उपचारांनी बरं वाटलं नाही, तर गुडघ्याची कृत्रिम सांधारोपणाची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचं सांगतात. शस्त्रक्रिया करण्याने किती रुग्ण बरे झाले याची आकडेवारी देतात आणि शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह धरतात.
शस्त्रक्रियेचा सल्ला ज्यांना मानवत नाही किंवा परवडत नाही, ती मंडळी पुन्हा आपल्या जुन्या उपचाराकडे वळतात. ज्यांना हा सल्ला पटतो, आर्थिकदृष्टया परवडतो, ते रुग्ण शस्त्रक्रिया करून घेऊन मोकळे होतात. शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यातील वेदना तर आजिबात नाहीशा झालेल्या असतात, म्हणून थोडा उत्साह वाढतो, पण शारीरिक हालचालीत फारशी सुधारणा झाल्याचं जाणवत नाही. तज्ज्ञ डॉक्टर धीर देतात. औषधं, विश्रांती आणि फिजिओथेरपी यातून सुधारणा होईल असं आश्वासन देतात. मांडी घालून बसणं कसं अनावश्यक आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतात.
शस्त्रक्रिया, औषधं, फिजिओथेरपी हे सर्व उपचार पुढे काही दिवस केल्यानंतर आपण पूर्णपणे बरे झालो नाही असं रुग्णाला हळूहळू वाटायला लागतं. कारण त्याच्या अपेक्षा खूप असतात आणि त्या काही पूर्ण झालेल्या नसतात. आपण थोडया प्रमाणात विकलांग झालो आहोत का? आपलं काही चुकलं कां? असे प्रश्न त्याच्या मनात यायला लागतात. त्याचं हिंडणं, फिरणं, उत्साह आणि आत्मविश्वास हळूहळू ढासळायला लागतो.
हे असं कां होतं? आधुनिक वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक पध्दतीने केलेली ‘कृत्रिम सांधारोपण’ शस्त्रक्रिया रुग्णाला समाधान का देत नाही? याचं एकमेव कारण म्हणजे हे उपचार बाहेरून केलेले, कृत्रिम स्वरूपाचे आहेत.
व्याधीचं नेमकं कारण काय आहे
याचं खरं ज्ञान हे जाणून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा आणि नेमका तोच होत नाही. प्रामुख्याने सांध्यांची झालेली झीज हे प्रमुख कारण अधिक असते. त्यामुळे ही झीज भरुन काढणारी न्युट्रीशन थेरपी (Food supplement) उत्तम.
व्याधीचे नेमके कारण जाणून, मूळ जाणून घेऊन जर त्यावर उपचार झाले तर रुग्णाला शारीरिक तसेच मानसिक रित्या बरे वाटायला लागते आणि ही झालेली झीज भरुन काढणारी न्युट्रीशन थेरपी (Food Supplements) आणि व्यायाम याच्या मदतीने सहज शक्य आहे.
थोडासा व्यायाम आणि झालेली झीज भरुन काढणारी न्युट्रीशन थेरपी (Food Supplements) यांच्या मदतीने गुडघेदुखी, सांधेदुखी बरी होऊ शकते ते ही विना साईड इफेक्ट.