Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांदळाचे ‘हे’ प्रकार तुम्हाला माहितेय का? जाणून घ्या, त्याचे आरोग्याला होणारे फायदे

भात किंवा तांदळापासून बववलेले पदार्थ अनेकांना प्रिय आहे. भारतीय खाद्य संस्कृतीत भाताचं महत्त्व सर्वात जास्त आहे. .याच तांदळाचे जगभरात किती प्रकार आहेत तसंच त्यांचे आरोग्याला होणार फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 12, 2024 | 03:07 PM
तांदळाचे 'हे' प्रकार तुम्हाला माहितेय का? जाणून त्याचे आरोग्याला होणारे फायदे

तांदळाचे 'हे' प्रकार तुम्हाला माहितेय का? जाणून त्याचे आरोग्याला होणारे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

भात हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भात खाल्ला म्हणजे जेवण जेवल्यासारखं वाटतं असं भातप्रेमी कायमच म्हणतात. पण तुम्हाला माहितेय का तांदळाचे जगभरात एकूण 1 लाख 20 हजार इतक्या प्रजाती आहेत. त्यातल्या त्यात आशियाई देशात तांदळाच्या एकूण 40 हजार प्रजाती आढळतात. चला तर जाणून घेऊयात तांदळाच्या विविध प्रजाती आणि त्यांचे आरोग्याला होणारे फायदे…

पांढरा तांदूळ
बहुतांश प्रमाणात पांढऱ्या रंगांच्या तांदळाचा भात हा सर्वात जास्त लोकप्रिय आहे. बासमती, इंद्रायणी, कोलम, मोगरा या आणि अशा पांढऱ्या रंगाचा तांदूळ भारतात सर्वाधिक मिळतो. कोकण पट्ट्यात देखील उकडा भात हा प्रामुख्याने खाल्ला जातो. पांढऱ्या रंगाच्या तांदळात कोंड्याचं प्रमाण कमी असतं. तसंच पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर पोटॅशिअम आणि सोडियमचं प्रमाण यात मोठ्या प्रमाणात आढळतं त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार दूर होतात.

हेही वाचा-  रोजच्या आहारात करा ‘या’ पांढऱ्या पदार्थाचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबत आरोग्याला होतील अनेक फायदे

तपकिरी रंगाचा तांदूळ

हा तांदळाला कोणत्याही प्रकारे पॉलिशिंग केलेले नसते. तपकिरी रंगाचा तांदूळ हा आग्नेय आणि दक्षिण आशियातील देशांत प्रामुख्याने आढळून येतो. विशेषत: भारत., चीन, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्ये तपकिरी रंगाच्या तांदळाची लागवड केली जाते. हा तांदळाचा भात खाणं आरोग्यदायी मानलं जातं. तपकिरी रंगांच्य़ा तांदळात प्रोटीनची मात्रा मुबलक प्रमाणात असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

काळ्या रंगाचा तांदूळ

या तांदळाचं पीक प्रामुख्याने इंडोनेशिया देशात घेतलं जातं. भारतात नागालँड,मणिपूर आणि छत्तीसगढ या राज्यात देखील काळ्या तांदळाची शेती केली जाते. जगभरात फक्त 10 टक्के या तांदळाची लागवड केली जाते. त्यामुळे हा तांदूळ फारच दुर्मिळ प्रमाणात आढळतो..या भाताच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. यात असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.

हेही वाचा- हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी साखरेचा वापर न करता बनवा पौष्टिक शेंगदाणा लाडू

लाल तांदूळ
लाल तांदूळ खासकरुन ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चीन, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, पापुआ न्यू गिनी, फिलीपिन्स, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम या देशात केली जाते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर लाल तांदळाचा भात खाणं फायदेशीर आहे. लाल तांदळाचा भात खाल्ल्याने वजन लवकर कमी होतं. या भाताच्या सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

 

 

Web Title: How many types of raw rice in world and his benefit for health in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 03:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.