साखरेचा वापर न करता बनवा पौष्टिक शेंगदाणा लाडू
वाढत्या वयासोबत हळूहळू हाडांचे आरोग्य बिघडून जाते. हाडं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू या समस्या वाढू लागतात. पूर्वीच्या काळी वयाच्या साठीनंतर हाडांचे दुखणे आणि इतर समस्या शरीरात जाणवू लागत होत्या. मात्र बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यामुळे वयाच्या तिशीमध्येच हाडांचे दुखणे वाढू लागले आहे. त्यामुळे रोजच्या आहारात शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ खाल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण काहींना कच्चे किंवा भाजलेले शेंगदाणे खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही शेंगदाण्याचे लाडू बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला साखरेचा वापर न करता शेंगदाण्याचे लाडू कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे लाडू 10 मिनिटांमध्ये तयार होतात. चला तर जाणून घेऊया लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी साबुदाणा ठरेल घातक, अन्यथा उद्भवतील आरोग्यासंबंधित गंभीर समस्या