Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

lifestyle News : पावसाळा फक्त पाऊस आणत नाही: वेळीच सावध व्हा, लहान बाळांना ‘आरएसव्ही न्यूमोनिया’पासून वाचवा!

आरएसव्ही न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायलाइटिसचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे याची सुरुवात साध्या सर्दीसारखी होते. बाळ वेगाने श्वास घेत आहे किंवा दूध कमी पीत आहे

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 14, 2026 | 06:10 PM
lifestyle News : पावसाळा फक्त पाऊस आणत नाही: वेळीच सावध व्हा, लहान बाळांना ‘आरएसव्ही न्यूमोनिया’पासून वाचवा!
Follow Us
Follow Us:

लेखक:
डॉ. अमिता कौल, विभागप्रमुख, असोसिएट चीफ आणि वरिष्ठ सल्लागार – बालरोग, नवजात शिशु आणि बालरोग अतिदक्षता सेवा, सूर्या मदर अँड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे.

आणि डॉ. प्रशांत उदावंत, विभागप्रमुख, नवजात शिशु आणि वरिष्ठ सल्लागार, बालरोग विभाग, रुबी हॉल क्लिनिक, पुणे.

पावसाळा सुरू झाला की, लहान मुलांमध्ये श्वसनाच्या जंतुसंसर्गाची (Respiratory Infections) लाट येते. या दिवसांत खोकला आणि सर्दी होणे सामान्य आहे, असे अनेक पालकांना वाटते. पण, लहान बाळाचे साधे वाहणारे नाक हे प्रत्यक्षात ‘रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस’ (RSV – आरएसव्ही) संसर्गाची सुरुवात असू शकते, याची फार कमी पालकांना कल्पना असते. जगभरात नवजात शिशुंमध्ये न्यूमोनिया होण्याचे हे एक मुख्य कारण आहे.

ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

मोठी मुले आणि प्रौढांमध्ये ‘आरएसव्ही’ हा सामान्य सर्दी-खोकल्यासारखाच असतो. परंतु, लहान बाळांमध्ये, विशेषतः एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये, याचे रूपांतर वेगाने न्यूमोनिया किंवा ब्रॉन्कायलाइटिस (फुफ्फुसातील लहान श्वासवाहिन्यांना सूज येणे) मध्ये होऊ शकते. यामुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि बऱ्याचदा रुग्णालयात दाखल करावे लागते, ऑक्सिजन द्यावा लागतो किंवा अतिदक्षता विभागात (ICU) ठेवावे लागते. जगभरात दरवर्षी लहान मुलांमधील न्यूमोनिया आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रकरणांमध्ये ‘आरएसव्ही’चा मोठा वाटा असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बालपणात झालेल्या ‘आरएसव्ही’च्या गंभीर संसर्गामुळे पुढे जाऊन मुलांमध्ये वारंवार धाप लागणे (Wheezing) आणि दम्याचा (Asthma) धोका वाढू शकतो.

“आरएसव्ही न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायलाइटिसचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे याची सुरुवात साध्या सर्दीसारखी होते. बाळ वेगाने श्वास घेत आहे किंवा दूध कमी पीत आहे, हे पालकांच्या लक्षात येईपर्यंत हा संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेला असतो. त्यामुळे आजाराची लक्षणे वेळीच ओळखून योग्य उपचार घेतल्यास पुढील गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते,” असे डॉ. अमिता कौल, विभागप्रमुख, असोसिएट चीफ आणि वरिष्ठ सल्लागार – बालरोग, नवजात शिशु आणि बालरोग अतिदक्षता सेवा, सूर्या मदर अँड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे यांनी सांगितले.

कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ

“बालरोगतज्ज्ञ म्हणून आमचे उद्दिष्ट केवळ गंभीर आरएसव्ही संसर्गावर उपचार करणे एवढेच नसून, तो होऊच नये म्हणून प्रतिबंध करणे हे आहे. हात स्वच्छ धुणे आणि आजारी व्यक्तींपासून बाळाला दूर ठेवणे यासारख्या साध्या उपायांसोबतच, पालकांनी आपल्या बालरोगतज्ज्ञांशी ‘आरएसव्ही इम्युनायझेशन’ (Immunization – प्रतिबंधात्मक उपचार/लसीकरण) बद्दल चर्चा केली पाहिजे. बाळाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येण्यापूर्वीच आजाराला रोखणे केव्हाही उत्तम,” असा सल्ला डॉ. प्रशांत उदावंत विभागप्रमुख, नवजात शिशु आणि वरिष्ठ सल्लागार, बालरोग विभाग, रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांनी दिला आहे.

आरएसव्हीचे आव्हान: सुरुवातीची लक्षणे
या आजाराची सर्वात चिंतेची बाब म्हणजे सुरुवातीला हा आजार अजिबात गंभीर वाटत नाही. सुरुवातीला बाळाला खालील त्रास होऊ शकतो:
नाक वाहणे किंवा नाक चोदणे (बंद होणे)
सौम्य खोकला किंवा शिंका येणे
बारीक ताप असणे
बाळ दूध किंवा अन्न कमी घेणे
परंतु, अगदी कमी वेळात ही लक्षणे वेगाने बिघडू शकतात. जर बाळाला खालील त्रास होत असेल, तर पालकांनी तातडीने डॉक्टरांकडे जावे:
बाळ वेगाने किंवा कष्टाने श्वास घेत असल्यास
श्वास घेताना बाळाची छाती आत ओढली जाणे (Chest Retractions)
बाळ दूध पिणे खूप कमी करणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे
बाळ नेहमीपेक्षा जास्त झोपणे किंवा सुस्त पडणे
ओठ निळे पडणे किंवा श्वास घेताना मध्येच खंड पडणे
लहान बाळांची प्रकृती वेगाने बिघडू शकते, त्यामुळे आजाराची लक्षणे वेळीच ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय!
आनंदाची गोष्ट म्हणजे, ‘आरएसव्ही न्यूमोनिया’पासून बाळाचा बचाव करणे शक्य आहे आणि प्रतिबंध हाच सुरक्षेचा पहिला मार्ग असावा. वारंवार हात धुणे, सर्दी-खोकला असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात बाळाला न आणणे, घरातील हवा खेळती ठेवणे, बाळ ज्या वस्तूंना सतत हात लावते त्या जागा स्वच्छ ठेवणे आणि आरएसव्हीच्या दिवसांत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, या साध्या उपायांनी संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी करता येतो. घरातील ज्या व्यक्तींना सर्दी-खोकल्याची लक्षणे आहेत, त्यांनी बाळाचे मुके घेणे टाळावे आणि बाळाला जवळ घेण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवावेत. तसेच, आईचे दूध बाळाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवत असल्याने स्तनपानाला प्रोत्साहन दिले पाहिजे.
तथापि, केवळ स्वच्छतेच्या उपायांनी हा धोका पूर्णपणे टाळता येत नाही.
आज वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीमुळे बाळाला गंभीर आजार होण्यापूर्वीच त्याचे रक्षण करण्यासाठी ‘आरएसव्ही इम्युनायझेशन’ (प्रतिबंधात्मक पर्याय) उपलब्ध झाले आहे. उत्तर अमेरिका, युरोप, मिडल इस्ट आणि जगातील इतर अनेक देशांनी लहान मुलांमधील आजारपण आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आरएसव्ही प्रतिबंधात्मक धोरणांचा आपल्या आरोग्य व्यवस्थेत समावेश केला आहे. हे प्रतिबंधात्मक पर्याय आता भारतातही उपलब्ध आहेत. त्यामुळे हा संसर्ग वाढण्याच्या काळात, आपले बाळ या संरक्षणासाठी पात्र आहे का, हे समजून घेण्यासाठी पालकांनी आपल्या बालरोगतज्ज्ञांशी नक्की चर्चा करावी.

पालकांसाठी एक महत्त्वाचा संदेश
पालक म्हणून आपण आपल्या मुलांना विविध आजारांपासून वाचवण्यासाठी लसीकरण करतो, कारण आजारावर उपचार करण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध करणे केव्हाही श्रेयस्कर असते. आरएसव्हीच्या बाबतीतही आपल्याला असाच जागरूक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. बाळाला श्वास घेण्यास त्रास होईपर्यंत वाट पाहू नका. साध्या सर्दी-खोकल्यासोबत जर बाळ वेगाने श्वास घेत असेल, दूध पीत नसेल, खूप सुस्त असेल किंवा त्याचे ओठ निळे पडत असतील, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. या पावसाळ्यात आपल्या मुलाचे केवळ पावसापासूनच नव्हे, तर बालपणातील या गंभीर श्वसनविकारापासूनही रक्षण करा!

Web Title: Monsoon alert how to protect babies from rsv pneumonia and bronchiolitis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • Healhy Lifestyle
  • healthy

संबंधित बातम्या

शुभ सोमवार! आठवड्याची सुरुवात करा ‘या’ प्रेरणादायी सुविचारांनी, मिळेल नव्या दिवसाची सकारात्मक ऊर्जा
1

शुभ सोमवार! आठवड्याची सुरुवात करा ‘या’ प्रेरणादायी सुविचारांनी, मिळेल नव्या दिवसाची सकारात्मक ऊर्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.