Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रूग्णांचा जीव धोक्यात! मुंबईत 2 हजारहून कमी रक्ताच्या बॅग शिल्लक, गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ‘लढा रक्तदानाचा’ संस्थेचंआवाहन

शहरात रक्तदान शिबिर होत नसल्याकारणाने मुंबई शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर देखील मोठं आव्हान उभं राहतंय.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 06, 2025 | 05:20 PM
रूग्णांचा जीव धोक्यात! मुंबईत 2 हजारहून कमी रक्ताच्या बॅग शिल्लक, गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ‘लढा रक्तदानाचा’ संस्थेचंआवाहन
Follow Us
Close
Follow Us:
  • रूग्णांचा जीव धोक्यात!
  • मुंबईत 1 हजारहून अधिकच रक्ताच्या बॅग शिल्लक
  • रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे केलं जातंय आवाहन

रक्तदान हे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं. अपघात असो किंवा इतर शस्त्रक्रिया रक्ताची गरज ही भासतेच. काही जण आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान राखत रक्तदान करतात. मात्र सध्या रक्तदान शिबिर होत नसल्याकारणाने मुंबई शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर देखील मोठं आव्हान उभं राहतंय.मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे दरवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करतं. या वेळी देखील रक्तदान शिबिरातील रक्त हे राज्य आणि परराज्यात संकलन करण्यात आलं. मात्र आता शहरातील रक्तपेढ्य़ांमधील रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसतोय.

Uric Acid च्या रुग्णांनी टाळा 3 भाज्यांचे सेवन, संधिवाताने व्हाल हैराण

नेमकं कारण काय ?

आरोग्य यंत्रणेसमोर आता हे नवं आव्हान उभं राहिलं आहे. खरंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याचं कारण म्हणजे रक्तदान शिबिराच्या आयोजनात होणारी घट. गणपतीनंतर शहरात म्हणावं तसं रक्तदान शिबिराचं आयोजन झालेलं नाही. दसरा दिवाळीच्या अनेक गावी सणवार साजरे करता. त्यामुळे रक्तदान शिबिराचं आयोजन कमी होत गेलं. याचाच परिणाम म्हणजे, रक्तपेढ्यातील रक्ताच्या बॅग कमी होत चालल्या आहेत. रक्ताची जेवढी मागणी होतेय त्या तुलनेत पुरवठा होण्यास अडथळा होतोय त्यामुळे जर असंच सुरु राहिलं तर भविष्यात ही समस्या मोठी होऊ शकते. असा धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर, राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन व्हावं यासाठी जनजागृती तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

करोडोंच्या संख्येने राहणाऱ्य़ा मुंबई शहरात सध्या, 1101 इतके रक्ताचे युनिट राहिल्याने आरोग्य यंत्रणा रक्तदान शिबिराने आयोजन करण्याचे आवाहन करत आहे. त्यातल्या त्यात भरीला भर म्हणजे बी निगेटिव्ह. एबी निगेटिव्ह या रक्तगटाचे युनिट संपल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. हे कमी की काय म्हणून रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांची शस्रक्रिया देखील पुढे ढकलावी लागली असल्याचं काही रुग्णालयांनी सांगितलं आहे.फक्त मुंबई महानगरपालिकाच नाही तर नवी मुंबई महानगर पालिकेतही रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचं दिसून येतंय.

 

याच समस्येवर मुंबई आणि उपनगरात मोठ्य़ा प्रमाणात रक्तदान शिबिर होण्यासाठी सामाजिक संघटना देखील आता पुढे सरसावल्य़ा आहेत. यातील एक सामाजिक संस्था ‘लढा रक्तदानाचा’ यांच्य़ा वतीने सायन रुग्णालयात रक्तदान करण्याचं आवाहन करत आहे.शस्रक्रिया आणि अपघात या व्यतिरिक्त देखील रक्ताची गरज असते ते थॅलेसेमियाच्या रुग्णांना. या रुग्णांना तब्बल 15 ते 20 दिवसांनी रक्ताची सतत गरज असते. अन्यथा यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. याचमुळे ‘लढा रक्तदानाचा’ या संस्थेने थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या भविष्यासाठी नागरिकांनी रक्तदान करावं. तसंच सोसायटी आणि कामाच्या ठिकाणी देखील रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यासाठी काही मदत हवी असल्याचं संपर्क करु शकता असं देखील सांगितलं आहे.

लढा रक्तदानाचा ही संस्था कोविड काळापासून रक्तसेवेत कार्यरत आहे. ही संस्था विविध रुग्णालयातील गरजूंपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करते. जर तुम्हाला तुमच्या सोसायटीत किंवा कामाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्याची इच्छा असल्यास ‘लढा रक्तदानाचा’ या संस्थेचे किशोर सातपुते यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क +91 99300 46079  करु शकता.

नसांमध्ये का जमते चिकट प्लाक? ब्लॉकेज साफ करण्याची पद्धत तज्ज्ञांचा खुलासा, रहा हेल्दी

Web Title: Patients lives at risk mumbai left with only 1000 blood bags authorities urge blood donation camps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

NCRB report on Drug Overdose: ड्रग्जच्या अतिसेवनाने दर आठवड्याला १२ जणांचा मृत्यू, NCRBच्या अहवालात धक्कादायक खुलासा
1

NCRB report on Drug Overdose: ड्रग्जच्या अतिसेवनाने दर आठवड्याला १२ जणांचा मृत्यू, NCRBच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Health Care Tips :  इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरताय ? मग आताचा सोडा ही सवय, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती
2

Health Care Tips : इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरताय ? मग आताचा सोडा ही सवय, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

Solapur News: 24 हजार रूग्णांना ‘आयुष्यमान भारत योजने’चा लाभ; तब्बल 55 कोटींचा निधी वितरित
3

Solapur News: 24 हजार रूग्णांना ‘आयुष्यमान भारत योजने’चा लाभ; तब्बल 55 कोटींचा निधी वितरित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.