सावध! टॉयलेटमध्ये 10 मिनिटांहून अधिक काळ फोन घेऊन बसणाऱ्या लोकांना कॅन्सरचा धोका, दिसू लागतात ही लक्षणं
बदलत्या या विज्ञानाच्या युगात अनेकांचे आयुष्य बबदलून टाकले आहे. आपला स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर टेक गॅझेट्स आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत. या तंत्रज्ञानाचे जसे आपल्याला फायदे होतात तसे काही नुकसान देखील होत असतात. याचे आपल्यावर होत असलेले दुष्परिणाम बऱ्याचदा पटकन दिसून येत नाही मात्र आपल्या आरोग्यावर याचा खोल परिणाम होत असतो. बऱ्याचदा आपण पाहतो की, आजकाल लोक टॉयलेटमध्ये अधिक वेळ घालवतात. याचे मूळ कारण हे त्यांचे फोन असते. लोक टॉयलेटमध्ये आपला फोन घेऊन जातात आणि फोनवर स्क्रोल करत व्हिडिओज पाहत बसतात, हे व्हिडिओज पाहण्यात ते इतके बुडून जातात की आपण किती वेळ टॉयलेटमध्ये घालवलाय याचा थानपत्ता त्यांना लागत नाही. मात्र या सवयीचा आपल्या आरोग्यावर फार गंभीर परिणाम होत असतो.
आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीचा अनुभव असेल की पूर्वी टॉयलेटमध्ये 5-10 मिनिटे लागत असायची मात्र आता हाच वेळ 20-25 मिनिटांच्या घरात पोहचला आहे. आपल्याला वाटते की ही फार साधी सवय आहे मात्र दीर्घकाळ असेल वागत राहिल्यास आपल्याला ळव्याध, पेल्विक मांसपेशींचे नुकसान, आणि गंभीर पचन समस्या होण्याची शक्यता असते. ही सवय आपल्या शरीराला मोठे नुकसान पोहचवत असते. चला तर मग टॉयलेटमध्ये अधिक वेळ घालवल्याने आरोग्यावर नक्की कोणते परिणाम होऊ शकतात याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मूळव्याध आणि ब्लड सर्क्युलेशन संबंधित समस्या उद्भवणे
टॉयलेट सीटवर अधिक वेळ घालवण्याने गुदद्वाराभोवती आणि मलाशयामध्ये रक्तवाहिन्यांवर दबाव पडतो. या भागावर सततचा ताण पडल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या सुजू लागतात आणि यामुळे मुळव्याधाची समस्या निर्माण होऊ लागते. गुरुत्वाकर्षणामुळे शरीराच्या खालच्या भागावर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया बाधित होते. परिणामी, गुदद्वारातील नसांवर परिणाम होतो आणि दीर्घकाळ मुळव्याधची समस्या उद्भवू लागते.
रेक्टल प्रोलॅप्स आजाराचा धोका वाढू लागतो
रेक्टल प्रोलॅप्स हा एक अवस्था आहे ज्यामध्ये गुदाशय किंवा त्यातील काही भाग शरीराच्या आत आपल्या सामान्य संलग्नक गमावतात आणि गुदद्वारातून बाहेर पडतात. ही समस्या टॉयलेट सीटवर अधिक बसल्याने अधिकतर उद्भवते. सतत टॉयलेट सीटवर बसल्याने आपल्या शरीरावर ताण पडतो आणि यामुळे ही गंभीर स्थिती निर्माण होते. रेक्टल प्रोलॅप्स ही आरोग्याची एक गंभीर समस्या आहे, जिच्यावर वेळीच उपचार करायला हवेत नाहीतर याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अशात टॉयलेट सीटवर मर्यादित आणि गरजे इतकाच वेळ घालवावा.
पचनाच्या समस्या आणि कॅन्सर
टॉयलेटमध्ये अधिक वेळ घालवण्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळ शौचाला बसून जोर लावल्यास गॅस्ट्रोइंटेस्टायनल विकारांचा धोका वाढतो. या स्थितीमध्ये बद्धकोष्ठता, गुदद्वारात वेदना किंवा रक्तस्राव अशा समस्या जाणवू लागतात. याशिवाय या सवयीमुळे आतड्यांचा किंवा मलाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढत असतो. जर तुम्हालाही शौचालयाच्या वेळी अधिक वेळ लागत असेल तर वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर योग्य ते उपचार करा.
लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पोट साफ होण्यासाठी हे उपाय येतील कामी
स्मार्टफोनपासून दूर राहा
तुम्हालाही जर टॉयलेटला जाताना सोबत स्मार्टफोन वापरण्याची सवय असेल तर वेळीच ही सवय मोडा. यामुळे तुम्ही टॉयलेटमध्ये कमी वेळ घालवाल आणि परिणामी तुमचे पोट योग्य रित्या साफ होईल.
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा
पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी तुम्ही आहारात ओट्स, बीन्स, फळं आणि भाज्या यांना समाविष्ट करू शकता.
भरपूर पाणी प्या
पचनक्रिया सुधारण्यासाठी शरीराला हायड्रेट करणे फार गरजेचे असते. त्यामुळे दररोज किमान 2.7 ते 3.7 लिटर पाणी प्या.
शौचासाठीची वेळ ठरवा
शक्यतो ठराविक वेळेतच शौचासाठी जा, यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
सध्याच्या काळात इंडियन बाथरूम पद्धती हळूहळू लुप्त होत आहेत आणि वेस्टर्न टॉयलेट्सचा वापर अधिक होऊ लागला आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.