
भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; गवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे
वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते
रंगांची ही उधळण आपल्या रोजच्या आहारात केली तर ती आरोग्यासाठी एक वरदानच ठरेल यात कोणतीही शंका नाही, रंग द्रव्यांमुळे भाज्या आणि फळांना त्यांचे रंग मिळत असतात. उदा. भाज्यांमधील हिरवा रंग येतो तो क्लोरोफिलमुळे, तर पिकल्या रिंगों का भाज्यांना त्यांचा रंग मिळतो तो करेटोनोइडसमुळे या रंगांमुळेच तर फळे आणि भाज्यांना त्यांचे विशिष्ट गुणधर्मोही मिळत असतात. चला कोणत्या रंग कोणत्या पदार्थात दडलेला आहे आणि त्याचे आरोग्याला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
हिरवा
हिरव्या फळभाज्यांमध्ये लुटीन व इंडोल नावाची फायटोकेमिकल्स असतात. त्यामुळे आतड्यांचे संरक्षण होते.
जांभळा
मेंदू निरोगी राहण्यासाठी जांभळ्या रंगांच्या फळ-भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे, उदा. जांभूळ, कांदे, जांभळ्या रंगाची कोबी, वांगे इत्यादी
नारंगी
प्लीहाच्या संरक्षणासाठी नारंगी रंगांची फळे खावीत. संत्र्यात व्हिटॅमिन सी तर असतेच पण काही प्रमाणात व्हिटॅमिन-ए सुद्धा असते. ते प्लोहेसाठी चांगले आहे.
काळा
काळा रंग लोकांना जास्त आवडत नाही. खासकरून खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये. पण काळ्या रंगांचा आहार फायदेशीर आहे. मनुका, काळ्या रंगाच्या
चवळीच्या शेंगा इत्यादी आवर्जून खाव्यात.
पांढरा
बटाटे, लसूण, इत्यादीच्या पांढऱ्या रंगाच्या पदार्थांमुळे फुफ्फुसाला फायदा होतो.
लाल
छातीच्या संरक्षणासाठी लाल रंगांच्या भाज्या, फळ खायला हवीत. लाल (गुलाली) रंगांच्या भाजीपाल्यात फायटो केमिकल्स असतात. टरबूज, पेरू, टोमॅटो इत्यादी या श्रेणीत येतात. स्टॉबेरी, रासबेरी आणि बीटरूटमध्ये एंथोसायनीन असतात. हा फायटोकेमिकल्समधील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. डायबिटीससंबंधित समस्या आसपास फिरकत नाहीत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.