World Stroke Day 2024: सतत टेन्शनमध्ये असता? वेळीच सावध व्हा, ही आहेत ब्रेन स्ट्रोकची लक्षणे!
जीवनशैलीतील ताण-तणावामुळे आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते. यातीलच एक आजार म्हणजे ब्रेन स्ट्रोक! ही एक अशी समस्या आहे, जिचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या ब्रेन स्ट्रोकला बळी पडणारे सर्वाधिक लोक हे तरुण आहेत, जी एक चिंताजनक गोष्ट आहे. अभ्यासात असे समोर आले आहे की, जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला ब्रेन स्ट्रोक आजार होण्याचा धोका वाढत असतो. या सवयींमध्ये काही सुधारणा केल्यास या आजराचा धोका टाळता येऊ शकतो.
ब्रेन स्ट्रोक कसा होतो?
मेंदूला पुरेसा प्राणवायूचा पुरवठा न झाल्यामुळे मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा ॲटॅक अथवा लकवा,याला ब्रेन ॲटॅक असंही म्हटलं जातं. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्त पुरवठा करणारी धमनी फाटली असता हा त्रास उद्भवू शकतो. सोप्या शब्दात, या आजरामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फुटते आणि अशाप्रकारे रक्तवाहिनीच्या फुटण्यामुळे किंवा ब्लॉकेजमुळे रक्त आणि ऑक्सिजन मेंदूच्या उतींपर्यंत पोहचू शकत नाही. या स्थितीवर वेळीच उपचार न केल्यास ते जीवावर बेतू शकते.
हेदेखील वाचा – World Stroke Day: स्ट्रोकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, बेतेल जीवावर
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे
लोक डोकेदुखीसारख्या अनेक किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करतात मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, हे कारण ब्रेन स्ट्रोकचे लक्षण ठरू शकते. मानवी मेंदू हा अत्यंत गुंतागूंतीच्या जोडण्या असलेला प्रचंड महत्त्वाचा अवयव आहे आणि आपल्या संदेशवहनात निर्माण झालेल्या किंचितशा त्रुटीविषयीही तो धोक्याची सूचना देत असतो ही गोष्ट आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे.
वोर्निंग साइन्स
तुमचे शरीर तुम्हाला या आजराचे काही वोर्निंग साइन्स देत असतो मात्र अनेकदा लोक ते समजण्यास फार उशीर करतात. डोके दुखणे, गरगरणे, भोवळ येणे अशी काही क्षणिक लक्षणे सुरुवातीला दिसू लागतात मात्र पुढे जाऊन यांचे मोठ्या स्वरूपात रूपांतर होते. दुसऱ्या बाजूला अवयव जड झाल्यासारखे किंवा बधीर झाल्यासारखे वाटू लागते. एखाद्याला अशी काही लक्षणे जाणवत असल्यास त्याने हे तात्काळ डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देणे फार महत्त्वाचे ठरते. ही लक्षणे तुमच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण करत असतात.
हेदेखील वाचा – World Stroke Day: स्लीप एप्नियामुळे वाढतोय स्ट्रोकचा धोका? तज्ज्ञांचा खुलासा
कसा करावा प्रतिबंध?
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.