या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
शरीरात रक्तप्रवाहाला होणारा अडथळा अतिशय घातक असतो. अगदी प्राणांवरही बेतू शकते. सर्वात धोक्याचे असते ते मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्याला अडथळा आला तर याला पक्षाघात किंवा ब्रेन स्ट्रोक म्हणतात. अनेकांना स्ट्रोक येण्यापूर्वी काही दिवस अगोदर डोकेदुखी तसेच शरीराच्या काही भाग सुन्न होतात किंवा मुंग्या जाणवतात. अनेकजण या त्रासाला अजिबात गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे स्ट्रोक जीवावर बेततो.
शरीराला योग्य रक्तपुऱवठा झाल्यास संपूर्ण शरीर सुरळीत चालते. हृदयाचे काम शरीराच्या इतर भागांत रक्त पोहोचवणे आहे. मात्र, मेंदूपर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे अनेक वेळा रक्त पोहोचत नाही. कधीकधी रक्तवाहिन्या फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्त गळते. हे रक्त मेंदूपर्यंत जेव्हा पोहोचू शकत नाही किंवा पोहोचत नाही अशा वेळी मेंदू काम करणे थांबवतो. ही ब्रेन स्ट्रोकची एकमेव स्थिती आहे. डॉ. पवन पै, इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशलिस्ट, मीरा रोड आणि मीरा भाईंदर मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
हेदेखील वाचा – World Stroke Day: स्लीप एप्नियामुळे वाढतोय स्ट्रोकचा धोका? तज्ज्ञांचा खुलासा
स्ट्रोकचे लक्षण काय आहे
लक्षणे घ्या जाणून
BEFAST हे स्ट्रोकचे संक्षिप्त रूप आहे ज्याबद्दल प्रत्येकाला माहित असले पाहिजे. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या
B अर्थात Balance संतुलन: चालण्यात अडचण येणे, शरीराचे संतुलन राखण्यात अडचण येणे
E अर्थात Eye: डोळे: दृष्टी धूसर होणे किंवा दृष्टी कमी होणे तसेच डोळ्यांवर ताण येणे ही चिंतेची बाब असू शकते कारण हे स्ट्रोकच्या लक्षणांपैकी एक आहे.
F अर्थात Face: चेहरा: ब्रेन स्ट्रोकचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. यामुळे चेहरा वाकडा होतो. याचा परिणाम चेहऱ्यावरील हावभावावरही होतो. स्ट्रोकमुळे तोंड किंवा डोळे अनेकदा प्रभावित होतात.
A अर्थात Ankle: हात: हात कमकुवत होतात हे स्ट्रोकच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे
S: संवाद: स्पष्टपणे बोलता न येणे
T अर्थात Time वेळ: स्ट्रोकवर उपचार करताना वेळ महत्त्वाची आहे. स्ट्रोकच्या रुग्णाला स्ट्रोकचे व्यवस्थापन करण्यासाठी टिश्यू प्लास्मिनोजेन ॲक्टिव्हेटर (टीपीए) किंवा मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी या औषधांसह तत्काळ उपचारांसाठी जवळच्या स्ट्रोक-रेडी हॉस्पिटलमध्ये नेले जाईल याची खात्री करा. यामुळे रुग्णाचे आयुष्य वाचविता येतो.
हेदेखील वाचा – ब्रेन स्ट्रोकची लक्षणे तसेच त्यावरील उपाय; जाणून घ्या
स्ट्रोकची इतर लक्षणे
कधी दुर्लक्ष करू नये
डोकेदुखी, उलट्या, आकडी, संतुलन गमावणे, चालण्यास असमर्थता, अशक्तपणा आणि चेहरा आणि पाय सुन्न होणे, गोंधळ उडणे, गिळण्यास किंवा खाण्यास अडचणी येणा यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. स्ट्रोकची लक्षणे व्यक्तिपरत्वे बदलू शकतात.
स्थितीच्या सुधारित पूर्वनिदानासाठी प्रत्येकाला स्ट्रोकच्या लक्षणांबद्दल शिक्षित करणे ही काळाची गरज आहे. एखाद्याने संतुलित आहार घ्यावा, दररोज व्यायाम करावा, ध्यानधारणा करून तणावमुक्त रहावे, वजन नियंत्रित राखावे आणि स्ट्रोक टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेऊन रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी.