जॉर्जियात ११ भारतीयांचा संशयास्पद मृत्यू; एकाच रूममध्ये सापडले मृतदेह
जॉर्जियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या 11 भारतीयांचा मृत्यू झाला असून एकच खळबळ माजली आहे. जॉर्जियातील गुडौरी या परिसरातील एका माऊंटन रिसॉर्टमध्ये ही घटना घडली आहे. जॉर्जियातील भारतीय दूतावासाने यासंबंधी एक निवेदन जारी केलं आहे. ही घटना दुर्भाग्यपूर्ण असून मृत नागरिकांचे मृतदेह भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे.
— India in Georgia (@IndEmbGeorgia) December 16, 2024
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्बन मोनॉक्साईडमुळे या सर्वांचा मृत्यू हा झाला आहे. त्यात ११ भारतीय आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही बाब पुढे आली आहे. रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बेडरूमजवळ पॉवर जनरेटर ठेवण्यात आलं होतं. लाईट गेल्यानंतर या जनरेटरचा वापर करण्यात आला होता आणि त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड संपूर्ण रुममध्ये पसरला आणि यात सर्वाचा गुदमरून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
जॉर्जिया पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रिसॉर्टवर फॉरेन्सिक तज्ज्ञांची एक टीम पाठवली आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर बंदिस्त ठिकाणी जनरेटरच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारतीय दूतावासाने मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत असून मृतदेह लवकरच भारतात पाठवले जातील, असं आश्वासन दिलं आहे.
उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये रात्री कुटुंबासोबत झोपलेल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचे कोणीतरी अपहरण केले. खूप शोधाशोध करूनही कोणताही सुगावा न लागल्याने तिच्या वडिलांनी बिथरी चैनपूर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीसांकडूनही चिमुकल्याचा तपास सुरु केला.
बिथरी चैनपूरच्या कचौली गावात रवी कुमार यांचे घर निर्जन आहे. रवी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कठोर परिश्रम करतो. त्याच्या घराला दार नाही, फक्त पडदा आहे.गरिबीमुळे त्यांनी व्हरांड्यात पेंढा पसरून पलंग तयार केला आहे.
1971 War : पाकिस्तानच्या ९०००० सैनिकांची शरणागती; १९७१ च्या विजयाचा तो ऐतिहासिक फोटो हटवला
ही घटना शनिवारी रात्री संपूर्ण कुटुंब एकाच बेडवर झोपले होते. आठ महिन्यांचा मुलगा हिमांशू वडील रवी कुमार आणि त्यांची पत्नी मीना यांच्यासोबत झोपला होता. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मीनाला जाग आली तेव्हा हिमांशू बेपत्ता होता.मुलगा बेपत्ता असल्याचे पाहून घरात एकच गोंधळ उडाला. गावातील लोकांचा जमाव तेथे जमला. माहिती मिळताच बिथरी चैनपूर पोलीसही पोहोचले.सर्वांनी मिळून मुलाचा शोध घेतला मात्र काहीही सापडले नाही. रवी कुमार यांच्या तक्रारीवरून बिथरी पोलिस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी रवीकडे चौकशी केली असता त्याने कोणाशीही वैर नसल्याचं म्हटलं आहे. यावर लोकांनी काही वन्य प्राण्याने मुलाला पळवून नेले असावे असा संशय व्यक्त केला. मात्र आई-वडील दोघांमध्ये झोपलेले असल्याने ही शक्यता नाही, असं ही नागरिकांचं म्हणणं आहे. यानंतर लोकांनी सांगितले की कदाचित कोणीतरी तांत्रिक मुलाला घेऊन गेला असेल, परंतु यालाही पुष्टी मिळाली नाही.