Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! होळीच्या कार्यक्रमाला प्राचार्यांनी दिला नकार; विद्यार्थ्यांनी प्राचार्यांसह १५० जणांना कोंडलं

मध्य प्रदेशमधील एका महाविद्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. शासकीय होळकर विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी होळी सणानिमित्त महाविद्यालयाच्या आवारात ७ मार्च रोजी होळी महोत्सवाचं आयोजन केलं होतं.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 28, 2025 | 09:09 PM
धक्कादायक! होळीच्या कार्यक्रमाला मुख्याध्यापकांनी दिला नकार; विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांसह १५० जणांना कोंडलं

धक्कादायक! होळीच्या कार्यक्रमाला मुख्याध्यापकांनी दिला नकार; विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांसह १५० जणांना कोंडलं

Follow Us
Close
Follow Us:

मध्य प्रदेशमधील एका महाविद्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. शासकीय होळकर विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी होळी सणानिमित्त महाविद्यालयाच्या आवारात ७ मार्च रोजी होळी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. मात्र होळकर होळी महोत्सवाला मुख्याध्यापकांनी नकार दिला. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांसह १५० प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना एका हॉलमध्ये कोंडलं होतं. या प्रकरणी चार विद्यार्थी नेत्यांना दोषी ठरविण्यात आलं असून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

विद्यार्थ्यांनी होळीनिमित्त डीजे आणि रेन डान्सचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना १५० रुपेय प्रवेश शुल्क ठेवले गेले होते. मात्र महाविद्यालयाने कार्यक्रमाला नकार दिला होता, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, होळकर महाविद्यालयाने होळीच्या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारली होती. तरीही विद्यार्थी नेत्यांनी या कार्यक्रमाचे पत्रक महाविद्यालयात लावले होते. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने चौकशी केली होती.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, २३ फेब्रवारी रोजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांची परवानगी नसतानाही होळीच्या कार्यक्रमाचे पत्रक महाविद्यालयात चिकटवले. महाविद्यालय प्रमुखांनी सूचना दिल्यानंतर सदर पत्रके काढून टाकण्यात आली. मात्र महाविद्यालयाच्या या कृतीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. २४ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात मुख्याध्यापकांसह प्राचार्य आणि इतर कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असताना विद्यार्थ्यांनी सभागृहाचा दरवाजा बाहेरून बंद केला.

घटनेचा तपास करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, या १५० जणांमध्ये महिलाही होत्या. विद्यार्थ्यांनी जवळपास ३० मिनिटे सर्वांना कोंडून ठेवले होते. मुख्याध्यापिका अनामिका जैन म्हणाल्या की, जिल्हा प्रशासनाने चौकशी केल्यानंतर चार विद्यार्थ्यांना दोषी ठरवले आहे. विद्यार्थ्यांनी शिस्तभंगाचा गंभीर असा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अतिशय कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली गेली. त्यामुळे चारही विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत असून त्यांना स्थलांतर दाखलाही तात्काळ देण्यात आला. मध्य प्रदेशमधील होळकर महाविद्यालयाची स्थापना १८९१ साली झाली होती. इंदूर येथे होळकर यांचे संस्थान असताना महाविद्यालय उभे राहिले होते.

Web Title: 150 college staff held hostage for rejecting holi event request in indore holkar science college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Holi 2025
  • indore news
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी
1

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता
2

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय
3

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य
4

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.