Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

18th Civil Services Day: विज्ञान भवनमध्ये होणार अधिकारी वर्गाचा गौरव; उपराष्ट्रपती अन् पंतप्रधान मांडणार विचार

18th Civil Services Day:  पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 'नागरी सेवा दिना'निमित्त देशातील सनदी अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन सहभागी होणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 21, 2026 | 11:17 AM
18th Civil Services Day celebrated PM Modi and Vice President C.P. Radhakrishnan address

18th Civil Services Day celebrated PM Modi and Vice President C.P. Radhakrishnan address

Follow Us
Close
Follow Us:
  • 18 वा ‘नागरी सेवा दिन होणार साजरा
  • विज्ञान भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन
  • पंतप्रधान मोदी आणि उपराष्ट्रपती राधाकृष्णन घेणार सहभाग
18th Civil Services Day: नवी दिल्ली : आज सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये ‘नागरी सेवा दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी ‘नागरी सेवा दिना’निमित्त देशातील सनदी अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहे. भारतात दरवर्षी नागरी सेवा दिन साजरा केला जातो, जो सनदी अधिकाऱ्यांना नागरिकांप्रति आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करण्याची आणि लोकसेवेतील उत्कृष्टतेसाठी स्वतःला पुन्हा समर्पित करण्याची आठवण करुन देतो. हा दिवस सनदी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या हितासाठी आपल्या कर्तव्यांप्रति स्वतःला पुन्हा समर्पित करण्यास आणि लोकसेवेतील उत्कृष्टता टिकवून ठेवण्यास प्रेरणा देतो.

सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनानुसार, १९४७ साली याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखिल भारतीय प्रशासकीय सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना, सनदी अधिकाऱ्यांना भारताचा भक्कम पाया असे संबोधले होते. हा प्रसंग नागरिक-केंद्रित प्रशासनाप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करतो. तेव्हापासून दरवर्षी नागरी सेवा दिन साजरा केला जातो.

हे देखील वाचा : इराणला कमी लेखण्याची चूक भोवली! इराणसमोर अमेरिकेची प्रतिमा धुळीस, टीकेची झोड

१८ व्या नागरी सेवा दिनाचे आयोजन

नागरी सेवा दिन २०२६ ची संकल्पना “विकसित भारत: नागरिक-केंद्रित शासन आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास” ही आहे. ही संकल्पना ‘विकसित भारत २०४७’ च्या दूरदृष्टीशी सुसंगत असून, पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिक-केंद्रित शासनाप्रती सरकारची वचनबद्धता दर्शवते. यामध्ये सर्वसमावेशक विकास आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवांची उपलब्धता यावर भर दिला जातो. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयांतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, मंगळवारी १८ व्या नागरी सेवा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : छत्तीसगडमधील जशपूरमध्ये विमान कोसळले; खासगी विमान डोंगरावर आदळले

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन देखील घेणार सहभाग

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन हे विज्ञान भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आणि कार्यक्रमाचे मुख्य भाषण देखील उपराष्ट्रपती देणार आहेत.  उद्घाटन सत्रात केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचे भाषण आणि कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन यांचे स्वागतपर भाषण यांचाही समावेश असेल. यानंतर “नागरी सेवांची भूमिका आणि परिणामकारकता: एक बाह्य दृष्टिकोन” या विषयावर पॅनल चर्चा होईल.

 

Web Title: 18th civil services day celebrated pm modi and vice president cp radhakrishnan address

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 11:17 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.