Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेससह 3 रेल्वेंचा एकत्र अपघात, मृतांचा आकडा 233 हून जास्त, 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

शालिमार-चैन्नई कोोरमंडल एक्सप्रेसचे 10 डबे ओडिशातील बालासोर जवळ बहानगा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन घसरले. हे 10 डबे दुसऱ्या रुळावर असलेल्या सशवंतपूर-हावडा या ट्रेनला जाऊन धडकले. यामुळं यशवंतपूर-हावडा ट्रेनचेही डबे घसरले. ते एका मालगाडीला जाऊन धडकले.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 03, 2023 | 06:58 AM
ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेससह 3 रेल्वेंचा एकत्र अपघात, मृतांचा आकडा 233 हून जास्त, 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी
Follow Us
Close
Follow Us:

बालासोर – शालीमारहून चैन्नईला जात असलेल्या कोरोमंडल एक्सप्रेससह (Coromandel Express) 3 रेल्वेंचा अपघात ( Railway accident)  बालासोर जिल्ह्यात बहानागा रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास झाला. या अपघातातील मृतांची संख्या 233 हून जास्त ( 233 deaths) असून, 900 हून अधिक प्रवासी या अपघातात जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

Ex-gratia compensation to the victims of this unfortunate train accident in Odisha;
₹10 Lakh in case of death,
₹2 Lakh towards grievous and ₹50,000 for minor injuries.

— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 2, 2023

पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत तर जखमींना २ लाखांची मदत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.

Odisha train derailment: Toll climbs to 233, says Chief Secretary Pradeep Jena

Read @ANI Story | https://t.co/h1mCrwhRrT#OdishaTrainAccident #PradeepJena #Odisha #BalasoreTrainAccident pic.twitter.com/71HQdc2xME

— ANI Digital (@ani_digital) June 3, 2023

नेमका कसा झाला अपघात ?

शालिमार-चैन्नई कोोरमंडल एक्सप्रेसचे 10 डबे ओडिशातील बालासोर जवळ बहानगा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन घसरले. हे 10 डबे दुसऱ्या रुळावर असलेल्या सशवंतपूर-हावडा या ट्रेनला जाऊन धडकले. यामुळं यशवंतपूर-हावडा ट्रेनचेही डबे घसरले. ते एका मालगाडीला जाऊन धडकले. तिन्ही रेल्वे वेगात असल्यानं या अपघाताची तीव्रता अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

#WATCH | Morning visuals from the site in Odisha’s Balasore district where two passenger trains and one goods train met with an accident yesterday

Rescue operations underway pic.twitter.com/gBn45RzncG

— ANI (@ANI) June 3, 2023

रात्रीपासून बचावकार्य सुरु

अपघातानंतर बचावकार्य तातडीनं सुरु करण्यात आलं. या मार्गावरील सर्व ट्रेन रोखून धरण्यात आल्यात. एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक प्रशासन आणि स्थानिक यांच्या मदतीनं रात्रभर या ठिकाणी बचावकार्य सुरु होतं.

Distressed by the train accident in Odisha. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families. May the injured recover soon. Spoke to Railway Minister @AshwiniVaishnaw and took stock of the situation. Rescue ops are underway at the site of the mishap and all…

— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023

अपघाताची उत्तस्तरीय चौकशी होणार

हा रेल्वे अपघात हा अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसचं या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरुन कसे घसरले, याची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. कोरोमंडल एक्सप्रेसनं एका मालगाडीला धडक दिली होती, त्यानंतर या रेल्वेचे १० ते १२ डबे रुळावरुन घसरुन दुसऱ्या रुळांवर पडले. दुसऱ्या रुळांवरुन येत असलेल्या यशवंतरपूर-हावडा एक्सप्रेस या घसरलेल्या डब्यांना जाऊन आदळली. यात या रेल्वेचे ३ ते ४ डबे घसरल्याची माहिती आहे.

 

ओडिशा सरकारतर्फे एक दिवसाचा दुखवटा जाहीर

या दुर्घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. शनिवारी राज्य सरकारच्या वतीनं कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलंय.

 

मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही रद्द

मुंबई-गोना  वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडणार होता, मात्र ओडिशातील दुर्घटनेनंतर आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

 

 

 

Web Title: 3 trains collide with coromandel express in odisha death toll exceeds 200 over 900 passengers injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2023 | 06:41 AM

Topics:  

  • odisa
  • PM Narendra Modi
  • Railway Accident

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
2

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
3

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
4

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.