
बस्तर जिल्हा झाला नक्षलमुक्त; LWE यादीतून नाव काढल्यामुळे गुंतवणूक, विकासाला चालना
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरू आहे. अशातच छत्तीसगडमध्ये नक्षलवादी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. डीआरजी बस्तर फायटर्स कोब्रा बटालियन आणि सीआरपीएफ यांच्या विजापूरच्या गांगलूर भागात संयुक्त कारवाई सुरू आहे. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत ४ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू असून आकडा वाढू शकतो.
[read_also content=”भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं जपान, 6.1 रिश्टर स्केल तिव्रता; लोकांना घरांपासून दूर राहण्याचा इशारा! https://www.navarashtra.com/world/earthquake-in-japan-of-6-1-richter-scale-nrps-519824.html”]
सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले असून ही संख्या वाढू शकते. अनेक स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात अनेक कारवाया करण्यात आल्या असून त्यात सुरक्षा दलांनी आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. नुकतेच विजापूर जिल्ह्यातही ६ नक्षलवादी मारले गेले.