Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : पुरी जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 600 हून अधिक भाविक जखमी

ओडिशातील जगप्रसिद्ध श्रीजगन्नाथ रथ यात्रेतून धक्कादायक बातमी आहे. रथ यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी पुरी शहरात चेंगराचेंगरी झाली असून ६०० हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 28, 2025 | 12:03 AM
पुरी जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ४० हून अधिक भाविक बेशुद्ध

पुरी जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ४० हून अधिक भाविक बेशुद्ध

Follow Us
Close
Follow Us:

ओडिशातील जगप्रसिद्ध श्रीजगन्नाथ रथ यात्रेतून धक्कादायक बातमी आहे. रथ यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी पुरी शहरात चेंगराचेंगरी झाली असून ६०० हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. श्रीनाहर, म्हणजेच गजपति राजाच्या महालाजवळ ही चेंगराचेंगरी झाली. शुक्रवारी सकाळी ‘पहाड़ी’ समारंभादरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या चेंगराचेंगरी जीवितहानी टळली आहे.

Ketu Gochar: शनि पुष्यामुळे ग्रहण योगाचे संयोजन, या राशीच्या लोकांच्या अडचणीत होऊ शकते वाढ

गजपति दिव्यसिंहदेव यांच्या महालाजवळ पहाड़ी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी रथ यात्रेला सुरुवात झाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि भाविकांनी एकमेकांना ढकलत धावाधाव सुरू केली. या गोंधळात अनेक जण बेशुद्ध पडले. गर्दी एवढी वाढली होती की, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला ती नियंत्रित करण्यात प्रचंड अडचणी येत होत्या.

#WATCH | Puri, Odisha | Ambulances reached the Rath Yatra spot after some people complained of suffocation and were reported unconscious due to humidity. The affected people were taken to the hospital and were provided with the required medical assistance https://t.co/Fie3j5sA03 pic.twitter.com/JYIkSUi7jj — ANI (@ANI) June 27, 2025

घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी भाविकांना त्वरीत पुरी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सर्वांचं उपचार सुरू आहेत. सीडीएमओ कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमी भाविकांची प्रकृती सध्या स्थिर असून आवश्यक उपचार पुरवण्यात येत आहेत.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये देखील रथ यात्रेदरम्यान अशीच चेंगराचेंगरी झाली होती. त्या वेळी अतिप्रचंड गर्दीत दम घुटल्यामुळे एका भाविकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त होतं. त्यामुळे यंदा प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही, पुन्हा एकदा मोठा अपघात टळला असला तरी भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Astrology: जुलै महिन्यात मोठ्या 6 ग्रहांचे होणार संक्रमण, या राशीच्या लोकांना मिळणार धन आणि संपत्ती

या वर्षी देखील पुरीच्या ग्रँड रोडवर लाखो भाविक जमले होते. बलभद्राच्या रथाला ओढताना रस्सीला स्पर्श करण्यासाठी हजारो लोक एकाच वेळी पुढे सरसावले. रथ गुंडिचा मंदिराकडे जात असताना, घटनास्थळापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर गर्दीने उधळपथ सुरू केली. यामुळे धक्का-बुक्की झाली, अनेक जण खाली पडले आणि काहींना दम घुटल्यासारखी स्थिती भासली.

जगन्नाथ रथ यात्रा ही ओडिशातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी रथ यात्रेच्या वेळी अशी घटना घडल्यामुळे भाविकांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. प्रशासनाने यावर अधिक परिणामकारक उपाययोजना करणे आता अनिवार्य ठरत आहे.

Web Title: 40 devotees injured in puri stampede in odisha jagannath rath yatra latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 10:20 PM

Topics:  

  • jagannath puri mandir
  • Odisha
  • Odisha news

संबंधित बातम्या

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर! भारतात स्वदेशी 4G नेटवर्क लाँच, स्वस्तात इंटरनेट अन् कॉलिंग, कसं वापराल? जाणून घ्या…
1

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर! भारतात स्वदेशी 4G नेटवर्क लाँच, स्वस्तात इंटरनेट अन् कॉलिंग, कसं वापराल? जाणून घ्या…

10 दिवस, 3520000000 रुपये, 36 मशीन्स…, ट्रकमध्ये भरावे लागल्या नोटा; भारतातील सर्वात मोठा आयकर विभागाचा छापा
2

10 दिवस, 3520000000 रुपये, 36 मशीन्स…, ट्रकमध्ये भरावे लागल्या नोटा; भारतातील सर्वात मोठा आयकर विभागाचा छापा

Odisha Crime : डोळे-कान काढले अन्…, नाल्यात सापडला १० वर्षांच्या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह, बलात्कार की हत्या? नेमकं काय घडलं?
3

Odisha Crime : डोळे-कान काढले अन्…, नाल्यात सापडला १० वर्षांच्या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह, बलात्कार की हत्या? नेमकं काय घडलं?

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर
4

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.